Mhaisal Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’च्या कामाची राज्यस्तरीय समितीमार्फत चौकशी करा

Irrigation Scheme : जत तालुक्यात कुंभारी, बाज, अंकले, बागेवाडी, धावडवाडीसह वंचित भागाला बंदिस्त वितरिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. तालुक्यात अंदाजे दीड हजार किलोमीटर या कामाचे स्वरूप आहे.

Team Agrowon

Sangli News : तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कामात अधिकारी व ठेकेदारांकडून मोठा गैरकारभार सुरू आहे. नियोजित अंदाजपत्रकानुसार पाइपलाइनचे काम चार ते पाच फूट जमिनीखालून होणे अपेक्षित असताना ठेकेदारांनी दीड, दोन ते अडीच फुटांच्या चरी खोदून पाइपलाइन पुरण्याचा प्रकार समोर आला आहे.

शिवाय, शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाइपलाइन नेली आहे. त्याच अंतरावर म्हैसाळ वितरिकेचीही पाइप बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात दिलेल्या तरतुदींनुसार ठेकेदाराने काम पूर्ण करावे, तसेच झालेल्या कामाची राज्यस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी, अन्यथा सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा काँग्रेसचे नेते नाथाभाऊ पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला.

जत तालुक्यात कुंभारी, बाज, अंकले, बागेवाडी, धावडवाडीसह वंचित भागाला बंदिस्त वितरिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. तालुक्यात अंदाजे दीड हजार किलोमीटर या कामाचे स्वरूप आहे. यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. शिवाय, ही योजना पूर्ण होणार, या अपेक्षेने दुष्काळी जनतेच्या दोन ते तीन पिढ्यांनी वाट पाहिली.

मात्र, ‘म्हैसाळ’चे अधिकारी व ठेकेदाकडून चुकीच्या धोरणामुळे भविष्यात या योजनेच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासह शेतकऱ्यांना भविष्यात शेतीचा विकास साधणे हा मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाइपलाइन पाच फुटांच्या खाली असेल तरच शेतीच्या व योजनेची पाइपलान सुस्थितीत राहणे, प्रशासकीय व शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे.

राज्य सरकारने चौकशी करावी : पाटील

जत तालुक्यात बंदिस्त वितरिका योजनेच्या कामात कोट्यवधींचा गैरकारभार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी नेते नाथाभाऊ पाटील यांनी केली. तसेच पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाचा इशारा दिला.

म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त वितरिकेच्या कुंभारी भागातील कामात कोणताही गैरकारभार झालेला नाही. कामाचा दर्जा तपासून घेऊन ठेकेदाराला बिल अदा केले जाणार आहे. शिवाय, पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीही त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे काम चुकीच्या पद्धतीने झाले असेल तर याची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला अंदाजपत्रकानुसार काम करण्यास भाग पाडू.
- खैतन भारदस्तकर, उपअभियंता, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, जत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

SCROLL FOR NEXT