Mhaisal Irrigation Scheme : म्हैसाळ योजनेसाठीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

Agriculture Irrigation Scheme : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलावर होणारा खर्च टाळण्यासाठी २०० मेगावॅटचा चौदाशे कोटी रुपयांच्या सौर ऊर्जा प्रकल्पास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.
Mhaisal Water Scheme
Mhaisal Water SchemeAgrowon
Published on
Updated on

Sangli News : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलावर होणारा खर्च टाळण्यासाठी २०० मेगावॅटचा चौदाशे कोटी रुपयांच्या सौर ऊर्जा प्रकल्पास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. ‘म्हैसाळ’च्या दोन हजार कोटींच्या विस्तारित योजनेसही मंजुरी मिळाली आहे. या योजनांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली.

खासदार पाटील म्हणाले, की जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हा खर्च टाळण्यासाठी ही योजना सौर वीज प्रकल्पावर चालवण्याचा प्रस्ताव २०२१ मध्ये दिला होता. त्यासाठी एका आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत योजनेचा सर्व्हे करण्यात आला.

Mhaisal Water Scheme
Tembhu Irrigation Project : ‘टेंभू’ला रिक्त पदांचे ग्रहण

त्यांनी वीज वापराचे लेखपरीक्षण करून दिल्यानंतर २०० मेगावॅटचा चौदाशे कोटींच्या सौरऊर्जा प्रकल्पास केंद्र शासनाने मंजुरी दिली. २४ ते २६ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे म्हैसाळ योजना विजेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा भार सोसावा लागणार नाही. या कामाची लवकरच वर्कऑर्डर दिली जाईल.

Mhaisal Water Scheme
Mhaisal Irrigation : आवर्तनातून सांगलीतील १३० तलाव पाण्याने भरणार

ते म्हणाले, की म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या दोन हजार कोटींच्या विस्तारित योजनेस मंजुरी मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजनही लवकरच होणार आहे. विस्तारित प्रकल्पासाठी राज्य शासन ९७२ कोटी रुपये देणार आहे. केंद्राकडेही निधीसाठी प्रयत्न करणार आहे. विस्तारित योजनेमुळे जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित ६५ गावांना लाभ होणार आहे.

‘टेंभू’साठीही प्रस्ताव देऊ

टेंभू उपसा सिंचन योजनाही सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल. या योजनेचाही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्व्हे करून विजेचे लेखापरीक्षण केले जाईल. विजेचे वाढते दर लक्षात घेतले, तर जिल्ह्यातील पाणी सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालल्या तरच त्या शेतकऱ्यांना परवडतील, असेही खासदार संजय पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com