Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Money Lending : जिल्हा उपनिबंधकांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करा

अकोला जिल्हा उपनिबंधकांनी केलेली चौकशी रद्द करावी, अशी मागणी सावकारग्रस्त समितीचे अध्यक्ष अरुण इंगळे यांनी केली आहे.

Team Agrowon

Buldana News ः येथील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संगमेश्वर बदनाळे यांच्या कार्यकाळातील सावकारी प्रकरणात नियमबाह्य झालेल्या कृतीची समकक्ष अधिकाऱ्यांऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी.

अकोला जिल्हा उपनिबंधकांनी केलेली चौकशी रद्द करावी, अशी मागणी सावकारग्रस्त समितीचे अध्यक्ष अरुण इंगळे यांनी केली आहे.

याबाबत इंगळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बुलडाणा जिल्हा उपनिबंधक बदनाळे यांच्या कार्यकाळातील सावकारी प्रकरणात नियमबाह्य केलेल्या कृतीची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीने केली होती.

जिल्ह्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या अवैध सावकारी व्यवहारातून हडपलेल्या शेतजमिनींच्या प्रकरणांची संख्या मोठी आहे. गेल्या काळात सावकारी प्रकरणे हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला.

आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी हा प्रकार सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर सहकारमंत्र्यांनी बदनाळे यांच्या कार्यकाळातील सावकारी प्रकरणांत झालेल्या गैरव्यवहाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी व त्यांना सक्तीचे रजेवर पाठविण्यात यावे, असे पत्र दिल्याचे मिळालेल्या माहिती अधिकार उत्तरातून उघडकीस आल्याचा दावा इंगळे यांनी केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश असतानाही विभागीय सहनिबंधक कार्यालयाने चौकशीसाठी समकक्ष अधिकारी नियुक्त केला.

जिल्ह्यातील सावकारी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी व जिल्ह्यात सावकारी कायदा गतिमान करण्यासाठी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक या पदावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी इंगळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

Soybean Milk Benefits: सोयाबीन दूध नवजात करडांसाठी फायदेशीर

Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा

Soybean BBF Sowing: सोयाबीनची बीबीएफवर लागवड फायदेशीर! काय आहे बीबीएफ?

Cattle Breeding: गोवंशामधील वळू निवड पद्धतीतील बदल

SCROLL FOR NEXT