International Dairy and Feed Exhibition  Agrowon
ॲग्रो विशेष

International Dairy and Feed Exhibition : पिंपरीत २४ पासून आंतरराष्ट्रीय डेअरी आणि फीड प्रदर्शन

Exhibition Update : आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी आणि फीड प्रदर्शनाचे २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पिंपरी येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी आणि फीड प्रदर्शनाचे २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पिंपरी येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध अभ्यासपूर्ण चर्चासत्रे होणार असून याचा दूध आणि पशुखाद्य उत्पादक शेतकरी, व्यावसायिक, डेअरी चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बेनिसन मीडियातर्फे आयोजित या तीनदिवसीय प्रदर्शनामध्ये ‘गोठा व्यवसायामध्ये नफा कसा वाढवावा, जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, क्लीन मिल्क प्रॉडक्शन, लॅबोरेटरी सेटअप, लॅब तपासणीच्या पद्धती, डेअरी प्लांट मशिनरी,

दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आइस्क्रीम व मिठाई उत्पादन व साठवणूक तंत्रज्ञान, डेअरी प्रॉडक्ट्स निर्यातीमधील संधी, डेअरी व्यवसायामधील लॉजिस्टिक्स, पशुखाद्य निर्मिती तंत्रज्ञान, मशिनरी सेट-अप, कच्या मालाची निवड व फॉर्म्यूलेशन’ अशा डेअरी व पशुखाद्य निर्मिती उद्योगासंबंधीच्या देशविदेशांमधील सुमारे १३५ कंपन्यांच्या मशिनरिंची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहे.

तसेच प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञांसोबत थेट संवाद साधून या व्यवसायांमधील अर्थकारण समजून घेता येणार आहे, यासोबत विविध शासकीय योजना व कायदेशीर बाबी यांचीही माहिती यावेळी देण्यात येणार आहे. प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Stock India : देशातील युरियाची विक्री वाढली; डीएपीची विक्री घटली, खतांचा साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा

Urea Purchase: शेतकरी घरबसल्या करु शकतात युरिया बुकिंग; तेलंगणा सरकारची विशेष सुविधा

Livestock Care: पशुसंवर्धन सल्ला (कोकण विभाग)

CCI Cotton Procurement: अकोटमध्ये ‘सीसीआय’ची कापूस खरेदी

Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग)

SCROLL FOR NEXT