KDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur DCC Bank : विविध कर्जांचे व्याजदर होणार कमी

Lon Interest : नोटाबंदीच्या काळातील २५ कोटी २७ लाखांच्या नोटा बॅंकेकडे शिल्लक आहेत. त्या बदलून मिळाव्यात आणि अर्बन बॅंकांना शाखा वाढवण्यात परवाननी मिळते पण जिल्हा बॅंकेला नसल्याचे निदर्शनास आणून पन्नास शाखांची मागणी करणार आहे.’

Team Agrowon

Kolhapur News : शैक्षणिक कर्जाच्या व्याजदरात एक टक्का, खावटी कर्जावर दीड टक्का आणि शेतीच्या मध्यम कर्जावरील व्याजदर अर्धा टक्का कमी करण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्हा बॅंकेच्या मुख्य इमारतीशेजारी उभारलेल्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना आमंत्रित केले आहे.

लवकरच त्यांची तारीख निश्‍चित होईल. त्यांच्याकडे कर्जमाफीमध्ये ‘नाबार्ड’ने अपात्र ठरविलेली ११३ कोटींची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील अपिल मागे घेण्यासाठी विनंती केली जाणार आहे. नोटाबंदीच्या काळातील २५ कोटी २७ लाखांच्या नोटा बॅंकेकडे शिल्लक आहेत.

त्या बदलून मिळाव्यात आणि अर्बन बॅंकांना शाखा वाढवण्यात परवाननी मिळते पण जिल्हा बॅंकेला नसल्याचे निदर्शनास आणून पन्नास शाखांची मागणी करणार आहे.’

उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, राजेश पाटील, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदींसह दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी उपस्थित होते. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी ठराववाचन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT