Dr. Usha Satpute Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : कपाशीची सघन पद्धतीने लागवड करा

Dr. Usha Satpute : उत्पादकतेत वाढ करण्यासाठी येत्या खरीप हंगामात कपाशीची सघन पद्धतीने लागवड करावी लागेल, असे प्रतिपादन विशेष कापूस प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक डॉ. उषा सातपुते यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : उत्पादकतेत वाढ करण्यासाठी येत्या खरीप हंगामात कपाशीची सघन पद्धतीने लागवड करावी लागेल, असे प्रतिपादन विशेष कापूस प्रकल्पातील तांत्रिक प्रशिक्षक डॉ. उषा सातपुते यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था व परभणी कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे कपाशीच्या उत्पादकता वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत उक्कलगाव (ता. मानवत) येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणात त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी सरपंच उत्तम गायकवाड होते. मंगरूळ येथील प्रगतिशील शेतकरी अशोक देशमाने, दिनेश चांडक, प्रकल्प समन्वयक अमित तुपे आदी उपस्थित होते. देशमाने म्हणाले, की योग्य अंतर ठेवून कपाशीची लागवड करावी.

शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवावी. गळ फांद्या काढून टाकाव्यात. त्यामुळे फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळते. बोंडांचा आकार वाढतो. उत्पादनात वाढ होते.

दादा लाड तंत्रज्ञानाने कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ झाली असे त्यांनी सांगितले. उक्कलगाव, इटाळी, केकरजवळा, मंगरुळ या गावातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT