Paddy Seed Conservation : पारंपरिक भाताच्या ६५० वाणांचं संवर्धन करणारा 'सीडिंग सत्या'

Sathynarayana Beleri : सत्यनारायण हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीसोबतच त्यांनी भाताच्या पारंपरिक वाणांचे संवर्धनाचे काम करतात.
Sathyanarayana Beleri
Sathyanarayana BeleriAgrowon
Published on
Updated on

Paddy Verities Seed Bank : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकार पद्म पुरस्कारांची घोषणा करते. देशातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा यासह मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र, यंदा जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये सत्यनारायण बेलेरी यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. केंद्र सरकारकडून बेलेरी यांना पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.

सत्यनारायण हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीसोबतच त्यांनी भाताच्या पारंपरिक वाणांचे संवर्धनाचे काम करतात. त्यांनी पारंपरिक भात पिकाच्या शेकडो वाणांची 'सीड बँक' तयार केली आहे. त्यांनी तयार केलेली सीड बँक पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात. पारंपरिक वाणांच्या संवर्धनानेच शेतीचा विकास होवू शकतो, असे सत्यनारायण यांचे म्हणणे आहे.

Sathyanarayana Beleri
Paddy SRT Technology : आदिवासी भागात रुजतेय ‘एसआरटी’ तंत्रज्ञान

'सीडिंग सत्या' नावाने ओळख

सत्यनारायण बेरेली हे केरळच्या छोट्या गावात राहतात. दक्षिण कन्नडपासून पाच किलोमीटरवर केरळच्या कासरगोड स्थित नेट्टानेगी या गावाचे त रहिवाशी आहेत. याच गावात ते भाताची शेती करतात. त्यांच्या कामामुळे गावातील लोकांनी त्यांना 'सीडिंग सत्या' हे नाव दिले आहे. पारंपरिक वाणांचे संवर्धन आणि बियाणे बँकेमुळे त्यांना ही ओळख मिळाली आहे.

Sathyanarayana Beleri
Environmental Conservation Seed Ball : बीज चेंडू मुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार

६५० हून अधिक पारंपरिक वाणांचे संवर्धन

भातशेची सोबतच सत्यनारायण यांनी पारंपरिक भाताच्या वाणांचे संवर्धन केले आहे. त्यांच्या सीड बँकमध्ये सध्या ६५० हून अधिक पारंपरिक भाताचे वाण आहेत. विशेष म्हणजे 'राजकायम' भाताची शेती करण्याचे श्रेयसुध्दा त्यांनाच दिले जाते.

सत्यनारायण यांच्या मदतीने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये राजकायम भाताची शेती केली जाते. १५ वर्षांपासून ते या भागात काम करत आहेत. 'पॉलिबॅग पध्दती'साठी त्यांना ओळखले जाते. ज्यामध्ये केवळ भातच नाही तर, सुपारी, जायफळ आणि काळी मिरी यांसारख्या पारंपरिक पिकांचे बियाणे संरक्षित केले जाते.

खाऱ्या पाण्यातही भातशेती

सत्यनारायण यांनी पिकवलेल्या काही वाणांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यासाठी ते केवळ सेंद्रीय खतांचा वापर करतात. सत्यनारायण यांच्याकडे संपूर्ण भारतातील भाताच्या काही दुर्मिळ जाती आहेत.

ज्यामध्ये एडी कुनी हे वाण पुराच्या पाण्यातही तग धरू शकते. तसेच मनिला जातीचा भात खाऱ्या पाण्यातही पिकवला जावू शकतो. त्यांच्या सीड बँकेत सुगंधित भाताचे अनेक वाण आहेत. याशिवाय सत्यनारायण यांनी शिवम आणि त्रिनेत्रा या दोन भाताचे वाण विकसित केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com