Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : सघन कापूस लागवड फायद्याची

Intensive Cotton Cultivation : कापसाच्या उत्पादकता वाढीसाठी सघन कापूस लागवड फायद्याची असल्याचे मत कृषीरत्न विजयआण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalana News : कापसाच्या उत्पादकता वाढीसाठी सघन कापूस लागवड फायद्याची असल्याचे मत कृषीरत्न विजयआण्णा बोराडे यांनी व्यक्त केले. विशेष कापूस प्रकल्पांतर्गत केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी व नुजिविडू सीड्स प्रा. लिमिटेड, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कचरेवाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांच्या शेतावर आयोजित कापूस शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण उद्धवराव खेडकर, भगवानराव डोंगरे, एकनाथराव खेडेकर, भीमाशंकर कचरे इत्यादी उपस्थित होते.

श्री बोराडे म्हणाले, की सघन कापूस लागवडीमध्ये योग्य वेळी कापसाची लागवड करून एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. शेतीमध्ये बहुतांशी कामे महिला करतात, शेती विषयी कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढवून तंत्रज्ञान महिलांना दिल्यास अधिक चांगला परिणाम मिळू शकतो. कापूस उत्पादन वाढीमध्ये सघन लागवड पद्धत, लवकर येणारे वाण, वातावरण, वाढ रोधकाचा वापर या सर्वांचा परिणाम किती प्रमाणात आहे याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास करावा, असे बोराडे म्हणाले.

श्री काळे म्हणाले, की डोळसपणे वाणाची निवड, तंत्रज्ञानाचा वापर शास्त्रीय पद्धतीने करा. शेतकऱ्यांनी शेती फायद्याची कशी राहील याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याप्रसंगी श्री. खेडेकर आणि श्री. डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुणे व सर्व शेतकऱ्यांनी श्री. जाधव यांच्या सघन पद्धतीने कापूस लागवड केलेल्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन चर्चा केली.

श्री. जाधव यांनी कापूस प्लॉटसंदर्भात तर सौ. मनीषा ठोकळ यांनी रेशीम शेती संदर्भात आपले अनुभव कथन केले. डॉ. एस. व्ही. सोनुने प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बी. आर. अंधारे यांनी तर आभार कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी कचरेवाडी, भाटेपुरी, हडप सावरगाव, शिवणी येथील शेतकरी उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

Cotton Crop Management: कपाशीच्या पातेगळच्या व्यवस्थापनासाठी उपाय

Dharashiv Rain : तीन दिवसांच्या पावसात सहाशे घरांची पडझड

SCROLL FOR NEXT