Cotton Cultivation : घन पद्धतीने लागवडीतून कापसाच्या उत्पादकेत वाढ शक्य

Cotton Productivity : कापूस पिकांतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना कराव्या लागतील.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : कापूस पिकांतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना कराव्या लागतील. घन पद्धतीने लागवड, शेंडे खुडणे या तंत्राच्या अंगीकारातून कापसाच्या उत्पादकेत वाढ करणे शक्य होईल, असे प्रतिपादन कापूस विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन योजना अंतर्गत कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प (आयआरएम) द्वारा सोमवारी (ता. ७) जागतिक कापूस दिना निमित्त आर्वी (ता. परभणी) येथे आयोजित शेतकरी गट

Cotton Cultivation
Cotton Cultivation : सघन कापूस लागवडीचा तयार होणार ‘अकोला पॅटर्न’

चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकल्प समन्वयक तथा सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, वरिष्ठ संशोधन सहयोगी गोपाळ भिसे, तांत्रिक सहाय्यक तांत्रिक सहाय्यक नारायण ढगे, शेतकरी प्रकाश हारकळ, भगवान झटकवडे, शिवाजी हारकळ, विलास हारकळ, नारायण उगले, हरिभाऊ हारकळ, एकनाथ हारकळ, संजय कदम, प्रभाकर हारकळ आदी उपस्थित होते.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : कापूस उत्पादन वाढीसाठी सघन कापूस लागवडीचा ‘अकोला पॅटर्न’

यावेळी प्रगतशील शेतकरी भगवान झटकवडे यांच्या कापूस लागवडीची पाहणी करण्यात आली.डॉ. पटाईत म्हणाले, की कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसान पातळी ओळखून फवारणीचा निर्णय घेतल्यास खर्च कमी करता येणे शक्य होईल. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी कपाशीचे फरदड उत्पादन टाळावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कापूस पिकाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यापीठाद्वारा कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यातील आर्वी, खानापूर (ता. परभणी), लोणी, टाकळगव्हाण, लिंबा (ता. पाथरी) या पाच गावांमध्ये कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत प्रतिगाव १२ शेतकरी मिळून एकूण ६० शेतकऱ्यांच्या शेतांवर कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com