Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : विमा परतावे, कपाशीला पंधरा हजार रुपये दर द्या

Shetkari Sanghtana Protest : कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये दर मिळावा, फळ पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले परतावे तत्काळ मिळावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये दर मिळावा, फळ पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले परतावे तत्काळ मिळावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेतर्फे चोपडा (जि. जळगाव) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

चोपडा - धरणगाव रस्त्यावर शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २८) आंदोलन केले. शेतकरी संघटनेचा जयघोष करण्यात आला. या वेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासन व पोलिस विभागास देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

आंदोलनात चोपडा तालुक्यातील विविध गावांमधील कार्यकर्ते, शेतकरी आदींनी सहभाग घेतला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यानिमित्त लावण्यात आला होता. शेतीचे विविध मुद्दे शेतकरी संघटनेचे संदीप पाटील व इतरांनी मांडले.

या वेळी संघटनेचे किरण गुर्जर, सचिन शिंपी, विनोद धनगर, प्रदीप पाटील, अजित पाटील, अखिलेश पाटील, कविता पाटील, जयश्री देशमुख, कोमल पाटील, प्रदीप माळी, वैभव पाटील, उर्वेश साळुंखे, समाधान पाटील, रवींद्र माळी, खुशाल सोनवणे, शरद पाटील, संदेश पाटील, राहुल पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील आदी उपस्थित होते.

मागण्या दृष्टिक्षेपात

खरिपातील कापूस पिकासंबंधी विमा परतावे लवकर मिळावेत, शेतीमालावरील निर्यातबंदी दूर करावी, उसाला पहिली उचल तीन हजार रुपये दिली जावी, कापूस उत्पादकांना एकरी ५० हजार रुपये अनुदान मिळावे, केळी, पपई पिकातील कटतीचा प्रकार बंद करावा, कटती लावणाऱ्या खरेदीदार, व्यापाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT