Sweet Orange Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Crop Insurance : मोसंबीसाठी विमा योजना

Team Agrowon

विनयकुमार आवटे
---------------------------------------------------
Crop Insurance Scheme : मोसंबीसाठी ही योजना अधिसूचित वर्धा, बुलडाणा, हिंगोली अकोला, नागपूर, नगर, अमरावती, धुळे, बीड, परभणी, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे.

या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर संदर्भ हवामान केंद्र आकडेवारीनुसार नुकसान भरपाई अंतिम केली जाते. या योजनेअंतर्गत मोसंबी ३ वर्षे वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

विमा संरक्षण प्रकार, प्रमाणके आणि नुकसान भरपाई

अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२३

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके---विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर अवेळी पाऊस, जास्त तापमान, जास्त पाऊस---८०,००० /----४०००/-ते ४,४००/-
गारपीट---२६ ६६७ /----१३३४/-

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
जिल्हे --- विमा कंपनी---
नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार--- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर--- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव--- भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग
१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

२) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा आणि पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

३) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)

४) शेतकरी मृग किंवा आंबियापैकी एका बहरात भाग घेऊ शकतो. एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

५) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

६) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

७) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
------------------------------------------------
(लेखक कृषी विभागात कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT