विनयकुमार आवटे
----------------------------
Insurance Scheme for Grapes : द्राक्ष पिकासाठी विमा योजना अधिसूचित जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनामार्फत उभारलेल्या संदर्भ हवामान केंद्रावरील आकडेवारी गृहीत धरण्यात येते.
या योजनेतंर्गत द्राक्ष दोन वर्ष वय झालेल्या पिकासाठी राज्याचे दोन भाग केले असून , त्या त्या भागानुसार हवामान धोके व नुकसान भरपाई रक्कम यात बदल आहे. द्राक्ष पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण निश्चित केले आहे.
द्राक्ष (अ) समाविष्ट जिल्हे नाशिक,नगर, धुळे व बुलडाणा
चौकट ः १ ः विमा संरक्षण प्रकार, कालावधी आणि नुकसान भरपाई
-----------------------------------------------
द्राक्ष (ब ) समाविष्ट जिल्हे ः सांगली, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, सातारा, बीड,लातूर,नांदेड व कोल्हापूर
चौकट ः २ ः विमा संरक्षण प्रकार, कालावधी आणि नुकसान भरपाई
विमाधारक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्यास ,नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे.
योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२३
चौकट ः३ शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके----विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रती हेक्टर
कमी तापमान,वेगाचा वारा,जादा तापमान------३,२०,००० ----१६,०००
गारपीट---१०,६६६७ ----५,३३४
चौकट ४ ः योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
जिल्हा व विमा कंपनी २०२१ ते २०२४
जिल्हा--- विमा कंपनी
नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार ---- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली,सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर ---एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.
रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव--- भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग ः
१) योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता
जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा आणि पीक लागवड स्वयंघोषणा पत्र , फळबागेचा(Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबूकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
३) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
४) एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.
५) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ % च्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५% पेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला ५% पेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.
६) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
७) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.