Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनीने तत्काळ २५ टक्के अग्रिम द्यावा

Advance Crop Insurance : खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विमा भरला.

Team Agrowon

Solapur News : खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विमा भरला. सद्यःस्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीकडे सादर केलेल्या अहवालानुसार खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना काढलेल्या सर्व पिकांसाठी २५ टक्के अग्रिमच तत्काळ द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी (ता.२०) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर तांबडे, शेतकरी प्रतिनिधी सुनील काशीद, उदय नानजकर, तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. दीक्षित, केतकी सिंदेकर पुणे येथून ऑनलाइनद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या सर्व पिकांसाठी सहा सप्टेंबर, १५ सप्टेंबर, ६ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर २०२३ अशा चार अधिसूचना कंपनीकडे सादर केलेल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यंत कमी पाऊस झालेला असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून वेळेत भरपाई रक्कम मिळणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी प्रीमियम भरलेला असून या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के नुकसान भरपाईपोटी अग्रिम रक्कम द्यावी,’’ असे निर्देश त्यांनी देऊन २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत स्कायमेटचा डेटा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी पडताळून ही कार्यवाही पूर्ण करावी, असेही सांगितले.

सोयाबीन, बाजरीला फटका, रब्बीचे क्षेत्रही घटणार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सूचित केले की, जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झालेला असून यावर्षी ५० टक्क्यांपेक्षा कमी रब्बी पेरणी होईल. तसेच उसाचे क्षेत्रही कमी होणार असून, सध्याची परिस्थिती दुष्काळाची असून कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकाबाबतची विम्याची रक्कम तत्काळ मंजूर करून शेतकऱ्याना वितरित करण्याची मागणी केली. शेतकरी प्रतिनिधी सुनील काशीद व उदय नान्नजकर यांनीही विमा कंपनीने तत्काळ विमा भरपाई रक्कम देण्याची मागणी केली.

वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल

विमा कंपनीचे प्रतिनिधी दीक्षित यांनी सोयाबीन, मका व बाजरीबाबत कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सकारात्मक अहवाल पाठवलेला आहे, त्याबाबत स्कायमेटच्या अहवालाची तपासणी कंपनीकडून २३ ऑक्टोबपर्यंत करून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येईल असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Sale Fraud: ‘पॉस’मधील गैरप्रकारांकडे सहा वर्षांपासून दुर्लक्ष

Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

SCROLL FOR NEXT