Crop Insurance : गेल्या वर्षीच्या खरिपातील विम्याचे कोट्यवधी अडकले

Crop Damage Compensation : यंदाच्या हंगामात नुकसान झाल्याने पीकविम्याच्या मागणीने जोर धरलेला असून जिल्हा समितीने २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश काढलेले आहेत.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या हंगामात नुकसान झाल्याने पीकविम्याच्या मागणीने जोर धरलेला असून जिल्हा समितीने २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश काढलेले आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षात (२०२२-२३) मंजूर झालेली पीकविम्याची रक्कम तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे समोर आलेले आहे.

याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या भडिमारामुळे स्थानिक कृषी यंत्रणा कमालीची त्रस्त झाली आहे. या प्रकरणात महिनोमहिने तोडगा निघत नसल्याने पेच तयार झालेला आहे.

गेल्या वर्षात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे विविध कारणांनी नुकसान झाले होते. यासाठी भरपाई म्हणून पीकविमा मंजूर करण्यात आला होता. स्थानिक आपत्ती प्रकारात ११६४१ शेतकऱ्यांचे तीन कोटी २३ लाख रुपये अडकलेले आहेत. काढणी पश्‍चात या प्रकारात २४४ शेतकऱ्यांचे ६२ लाख ४४ हजार, तर पीक कापणी प्रयोग आधारीत प्रकारात सर्वाधिक ६३ हजार ५९५ शेतकऱ्यांचे सुमारे ३८ कोटी ३२ लाख ८५ हजार ९०३ रुपये अडकले आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या वर्षात जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ट विमा कंपनी होती. या कंपनीमार्फत स्थानिक आपत्तीच्या प्रकारात ६८२२७ शेतकऱ्यांना ५६ कोटी २८ लाख रुपये खात्यात जमाही केले गेलेले आहेत. शिवाय काढणी पश्‍चात ५१९६ शेतकऱ्यांना ११ कोटी ८४ लाख ९५ हजारांचा लाभ मिळालेला आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती केली जात नसल्याचे समोर आलेले आहे.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : भरपाईअभावी शेतकऱ्यांची फळपीक विम्याकडे पाठ

यंदा पीकविम्याची कंपनी जिल्ह्यासाठी बदललेली आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. पीकविम्याच्या विषय विमा कंपनीच्या अखत्यारीत असल्याने स्थानिक यंत्रणांकडे याबाबत कुठलेही समाधानकारक उत्तर नसते.

Fruit Crop Insurance
Crop Insurance Survey : पीकविम्याच्या सर्वेक्षण अर्जांवर खोट्या सह्या

पोर्टल अपडेट, केवायसी लिंकिंग अशा विविध कारणाने पीकविमा मदत रखडल्याचे सांगितले जात आहे. परंतु याबाबत कंपनीस्तरावरून कुठल्या उपाययोजना होत आहेत, याची माहिती कुणीही द्यायला शेतकऱ्यांना तयार नाही.

सलग दोन वर्षे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. यंदा सोयाबीनचे जेमतेम पीक येत आहे. गेल्या हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीची मदत दिली जात नाही. कोट्यवधी रुपये अडकून पडल्याचा प्रकार झसोयाबीनला आठ हजार रुपये दरासाठी ‘स्वाभिमानी’चा मालेगावमध्ये बंदालेला आहे. कृषी आयुक्तालयाने दखल घेत अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना निदान यंदाच्या दिवाळीसाठी तरी ती पीकविम्याची रक्कम विमा कंपनीकडून मिळवून द्यावी.
-विलास ताथोड, सोशल मीडिया प्रमुख, शेतकरी संघटना, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com