Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कपन्यांनी २५ टक्के अग्रिम तात्काळ द्यावे

Insurance Company : जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीकडे सादर केलेल्या अहवालानुसार खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना काढलेल्या सर्व पिकासाठी २५ टक्के अग्रीम तत्काळ द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

Team Agrowon

Solapur News : खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पीकविमा भरला. सद्यस्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीकडे सादर केलेल्या अहवालानुसार खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना काढलेल्या सर्व पिकासाठी २५ टक्के अग्रीम तत्काळ द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

सोलापूर जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या सर्व पिकांसाठी ६ सप्टेंबर, १५ सप्टेंबर, ६ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर २०२३ अशा चार अधिसूचना कंपनीकडे सादर केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यंत कमी पाऊस झालेला असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून वेळेत भरपाई रक्कम मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी प्रीमियम भरलेला असून, या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के नुकसान भरपाई अग्रीम द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिला.

२३ ऑक्टोबरपर्यंत स्कायमेटचा डेटा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी चेक करून ही कार्यवाही पूर्ण करावी असेही त्यांनी निर्देशित केले.

विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. दीक्षित यांनी सोयाबीन, मका व बाजरी याबाबत कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सकारात्मक अहवाल पाठवलेला असून, त्याबाबत स्कायमेटच्या अहवालाची तपासणी कंपनीकडून सोमवारी सायंकाळपर्यंत करून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येईल, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT