MPSC Success Story Agrowon
ॲग्रो विशेष

Inspiring Success Story : अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली अधिकारी

MPSC Assistant Clerk Post : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यांमध्ये रिसोड तालुक्यातील मोहजा इंगोले येथील कोमल कैलास मोरे हिची महसूल सहायक पदावर नियुक्ती झाली आहे.

Team Agrowon

Washim News : येथून जवळच असलेल्या मोहजा इंगोले येथील अल्पभूधारक व सामान्य कुटुंबातील कोमल हिची महसूल सहायक पदावर नियुक्ती झाली आहे. गावकऱ्यांच्या वतीने शिवजयंतीच्या पावन पर्वावर कोमल हिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यांमध्ये रिसोड तालुक्यातील मोहजा इंगोले येथील कोमल कैलास मोरे हिची महसूल सहायक पदावर नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी गावातील मुलांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या असून त्यामध्ये पोलिस निरीक्षकासह विविध पदांवर काम करीत आहेत. परंतु कोमल मोरे ही गावातील पहिली मुलगी शासकीय सेवेत नियुक्त झाली आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण रिसोड येथे श्री शिवाजी विद्यालयात झाले. विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर तिने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने हिंगोली येथे आरोग्य विभागात आरोग्य सहायक या कंत्राटी पदावर काम करीत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

जिद्दीच्या जोरावर व मेहनतीने महसूल सहायक पदावर निवड झाली. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोमलच्या यशानिमित्त मोहजा इंगोले गावचे माजी सरपंच घनश्याम मापारी यानी शिवजयंतीच्या पर्वावर त्यांच्या घरी जाऊन कैलास मोरे व गिताबाई मोरे यांचा सत्कार करून छञपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. या वेळेस अंकुश कालापाड, वैभव इंगोले, कृष्णा साबळे, मंगेश साबळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

War impact on farmers : युद्धामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का; नाना पटोलेंचा सभागृहात सवाल, मंत्री राणेंचं उत्तर

Farm Roads On 7/12: राज्यातील पाणंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद होणार; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Agrowon Podcast: कांदा, कापूस-मक्याचे दर दबावात; सोयाबीन स्थिर तर खरबुजाची आवक वाढली

Bamboo Farming: बांबूला हवा मूल्यसाखळीचा आधार

Water Supply Demand: जलवाहिनीचे काम बंद पाडू

SCROLL FOR NEXT