Market Bulletin: सोयाबीनचे दर स्थिरसोयाबीनच्या भावात काल काहीशी वाढ झाल्यानंतर आज दरात स्थिरता आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात सोयाबीनची आवक सरासरीएवढी होत असल्याचे बाजारातील आवकेवरून स्पष्ट होते. बाजारात आज सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयाने विकले गेले. सरकारने राज्यात खरेदी केलेल्या सोयाबीनचा साठा सरकारकडे पडून आहे. त्यामुळे बाजाराचे लक्ष सरकारच्या विक्रीकडे आहे. .कापूसाचे दर दबावातचराज्यात कापूस खरेदीला मुदतवाढ मिळाली. मात्र, सुट्ट्यांमुळे खरेदी बंदच होती. बाजारातील आवकही कमीच राहीली. अनेक ठिकाणी बाजार दोन दिवस बंदच आहेत. पण सध्या बाजारभाव दबावातच असल्याचे दिसत आहे. कापसाला बाजारात आज ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र सरकारची कापूस विक्री सुरुच आहे. तसेच सरकार कापसाचा भाव कमी करत आहे. याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येत आहे..Agrowon Podcast: आल्याचे भाव टिकून; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दबावातच, हरभरा आवक वाढली तर मिरची उठाव टिकून.कांदा दर दबावातबाजारातील कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या भावावर दबाव आला आहे. लेट खरिप आणि रब्बी कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. आवक वाढलेली आहे. मात्र दुसरीकडे निर्यात अडचणीत आली आहे. युध्दामुळे मध्य पुर्वेतील निर्यातही थांबली आहे. याचा कांदा दरावर परिणाम होत आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपये भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Sugar Production: साखर उत्पादनात १२ टक्के वाढ होणार.मक्याचे भाव दबावातचदेशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरु आहे. त्यातच आयातीची शक्यता असल्याने दबाव वाढला आहे. देशातील उत्पादन यंदा वाढलेले आहे. त्याचा दबाव दरावर आधीच आलेला आहे. रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव यंदा कमी झालेला आहे. याचा दबाव भावावर आलेला आहे. सध्या मका बाजारात १६०० ते १९०० रुपयाने विकला जात आहे. पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबावरही कायम राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..खरबुजाची आवक सुधारलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपसून खरबुजाची आवक वाढली आहे. अनेक बाजारांमधील आवक वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने खरबुजाला चांगली मागणी आहे. खरबुजाचा तोडा सध्या कमी प्रमाणात होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तरीही खरबुजाला सध्या बाजारात सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. खरबुजाची आवक पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे. तर मागणीही वाढणार आहे. त्यामुळे दरपातळी स्थिर दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.