Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur Crop Damage : नागपूर जिल्ह्यातील नुकसानाची महसूल मंत्र्यांकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी

Heavy Rainfall in Nagpur : सप्टेंबर महिन्यात नागपूर विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाहणी केली.

Swapnil Shinde

Nagpur Flood News : गेल्यात नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. तसेच हातातोंडीशी आलेल्या सोयाबीन पिकांवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काटोल तालुक्यातील सोयाबीन व संत्रा उत्पादकांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

नागपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. आता महसूल मंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन नुकसानाची पाहणी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी अकोला येथील आपला नियोजित कार्यक्रम आटपून त्यांनी दुपारी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, काटोल, पावनवाडी, पारडसिंगा येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करूनपरिस्थितीचा आढावा घेतला.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सोयाबीनवर आलेल्या 'पिवळ्या मोजाक व्हायरस ' या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती महसूल मंत्र्यांना दिली. कीड नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्याची खात्री त्यांनी यावेळी केली. पंचनामे राहिले असतील तर पूर्ण केले जातील असेही त्यांनी सांगितले.

पावनवाडी येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. आज ते दुपारी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा ते घेणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Management : कपाशीतील कायिक वाढ व्यवस्थापन

Cotton Disease Management : कपाशीतील आकस्मिक मर व्यवस्थापन

Online Money Games Bill : केंद्र सरकारकडून ऑनलाईन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर

Animal Care : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीत पशुधनाची काळजी

Bail Pola Festival : जपा बैलांचे आरोग्य...

SCROLL FOR NEXT