Sanjana Hebbalkar
नागपूरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊल पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला आणि ४ तासात १०० मिमी इतका पाऊस पडल्याने नागानदीला पूर आला आहे.
परतीच्या मान्सूनचा पर्व सुरु झाला असून याच परतीच्या पावसाने नागपूरांच्या नाकी नऊ आणले आहे. पावसाचं पाणी घरात शिरलं आहे
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे राहिवासांचे जास्त हाल झाले. किचन, हॉल रुममध्ये सगळ्या ठिकाणी पाणी शिरले
यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच नागलवाडी, मोरभावन बस स्टॅन्ड, सिताबर्डी, पंचशील चौक, अंबाझरी परिसरात पाणी साचले आहे.
नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीमकडून बचाव कार्य सुरू आहे.