ICAR Conference Agrowon
ॲग्रो विशेष

ICAR Conference : कृषी क्षेत्रात तरुणांसाठी संशोधनांच्या संधी

Agriculture Research : नवीन संशोधनामुळे उद्योजक, कृषी उद्योजक व तरुणांमध्ये निश्‍चितच बदल घडला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : ‘‘नवीन संशोधनामुळे उद्योजक, कृषी उद्योजक व तरुणांमध्ये निश्‍चितच बदल घडला आहे. नवसंशोधनांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने ‘इनोव्हेशन्स फॉर इनोव्हेशन्स’ या राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या डॉ. चिमा सभागृहात बुधवारी (ता. २४) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्री. अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, माजी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, प्रवीण शुक्ला, भारत भोजने, डॉ. आदित्य अभ्यंकर, सुरेश कुलकर्णी, डॉ. एम. जी. शिंदे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. एस. बी. खरबडे, डॉ. जी. के. ससाने, डॉ. अतुल अत्रे उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे म्हणाले, की अद्ययावत शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मसात होण्यासाठी राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकॉक, मलेशिया आणि थायलंड या देशात ड्रोन तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले होते.

याशिवाय प्राध्यापक व वरिष्ठ अधिकारी यांनाही थायलंड येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी केले. तर आभार डॉ. रवी आंधळे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT