Buldana News : यंदा पावसाची अपेक्षित साथ मिळाल्याने सोयाबीनचे पीक चांगले येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, परतीच्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान करून शेतकऱ्यांचे स्वप्न चूर केले. .सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत दर (एमएसपी) पाच हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल मिळेनासा झालेला आहे. व्यापारी सोयाबीनच्या प्रतीनुसार तीन हजार ते चार हजार २०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असल्याची भावना आहे..Soybean Market: अमरावती बाजार समितीत सोयाबीनच्या आवकेत वाढ.सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक झालेले आहे. कमी जोखमीचे पीक मानले जाते. यंदा निसर्गाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्यांचा घात केला. टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती; पण परतीच्या पावसामुळे गुणवत्ता घसरली. हमीभाव केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात विक्री करावी लागत आहे..Soybean Procurement: सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून पणनमंत्री रावल : आजपासून नोंदणी.दरम्यान, उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तसेच मळणीचे वाढलेले दर (प्रति क्विंटल सुमारे ३०० रुपये) लक्षात घेतल्यास शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरत आहे..मागील काही वर्षातील हमीदरवर्ष हमीभाव२०२१ तीन हजार ९५०२०२२ चार हजार ३००२०२३ चार हजार ६००२०२४ चार हजार ८९२२०२५ पाच हजार ३२८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.