जोपर्यंत कर्जाचा हप्ता बँकेत जात नाही; तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, बच्चू कडूंचा इशारामेंढपाळांच्या विषयावर चर्चा झाली आहे शेतमजुरांच्या विषयी या आठवड्यात बैठक होईल.Bacchu Kadu on Farm Loan Waiver: 'आंदोलन अजून सपंलेले नाही. जोपर्यंत कर्जाचा हप्ता, पैसे बँकेत जात नाहीत; तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार! हम यहाँ खडे हैं... हम अभी जिंदा हैं', अशा शब्दांत इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे..कर्जमाफीचे ऐतिहासिक आंदोलन आणि त्यानंतर सरकारशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू यांचे शुक्रवारी (दि. ३१) नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा देण्यात आल्या..Farm Loan Waiver: तीन तास वादळी चर्चा, सरकारकडून रेटारेटी अन् निर्णय...; नेमकी किती होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी? .यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ''याच नागपुरात मी २००७-०८ मध्ये शोले आंदोलन केले. त्याच नागपूरनं रायगडमध्ये सुरु झालेले आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केले. अजून डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत कर्मचारी, मच्छिमारांचा विषय आहे. मेंढपाळांच्या विषयावर चर्चा झाली. शेतमजुरांच्या विषयी या आठवड्यात बैठक होईल.''.Bacchu Kadu Karjmafi : ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची बैठक संपली.आंदोलन काळात नागरिकांना त्रास झाला. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता. सरकारने हात वर केल्याने ही वेळ आली, असेही बच्चू कडू यांनी नमूद केले..३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर सरकार झुकलं, अशीही पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे. .जर गुरुवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ३१ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन उभं राहील आणि संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला होता. पण कालच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण ही तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे. रब्बीची पेरणी करता यावी, म्हणून आता ३२ हजार कोटींच्या पॅकेज वितरणास प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.