Jalgaon News : खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण कायम आहे. मध्यंतरी जोरदार पाऊस व ढगाळ वातावरण होते. गेले सहा-सात दिवस पावसाने धुमाकूळ केला, अजूनही ढगाळ वातावरण असून, उकाडा वाढला आहे. .खानदेशात पेरण्या रखडल्या आहेत. काही भागात पूर्वमशागत सुरू आहे. पण अनेक भागात ट्रॅक्टर चालक पावसामुळे मशागत टाळत आहेत. काही दिवस निरभ्र वातावरण आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण ढगाळ वातावरण आहे..स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणच नाही. यामुळे काळ्या कसदार जमिनीत वाफसा तयार होत नाही. केळीसह भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती कायम आहे. कापसाची खेडा खरेदीदेखील सुरू झालेली नाही. कारण कापूस वेचणीतही अडथळे आहेत. निरभ्र, कोरड्या वातावरणाची पिकांना गरज आहे. .Rabi Season: अमरावती जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगाम.मध्यंतरी पावसाने कापूस काळवंडला. त्याचे दर कमी झाले आहेत. कारण त्यात ओलावा वाढल्याचे खरेदीदार सांगत आहेत. पावसामुळे कापूस उत्पादकांना अधिकचा फटका खानदेशात बसला आहे. त्यात ढगाळ वातावरण असल्याने कापूस वाळविता येत नाही..Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक.चारा वाहतूक रखडलीपावसाने रब्बीतील पिकांची पेरणी, केळीची काढणी, शेतात पडून असलेल्या चाऱ्याची वाहतूक रखडली आहे. ही कार्यवाही पाऊस थांबताच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु पावसाळी, ढगाळ वातावरण कायम आहे. थंडीची प्रतीक्षा आहे. विषम वातावरणाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. सततच्या विषम वातावरणामुळे पिकांत किडी वाढत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण राहते..थंडी गायब, धुके दिसू लागलेमागील आठवड्यात खानदेशात अनेक भागांत पाऊस झाला. यानंतर ढगाळ व पावसाळी वातावरण कायम आहे. पहाटे धुके होते. या आठवड्याच्या सुरुवातीला अनेक भागात हलका पाऊस झाला. जळगावमध्ये चोपडा, धरणगाव, जळगाव, एरंडोल, पाचोरा आदी भागात हलका पाऊस झाला. काही भागात पाऊस नव्हता. नंदुरबार, धुळ्यात मोठी हानी पावसाने झाली. धुळ्यातही धुळे, शिरपूर भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. नंदुरबारातील काही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. थंडी गायब झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.