Jaykwadi Water Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Water : जायकवाडीतील पाण्याची आवक घटली

Water Crisis : नाशिक, नगर भागांतील धरण समूहातून सोडल्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थांबवल्यानंतर आता हळूहळू जायकवाडीतील पाण्याचे आवकही घटत चालली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : नाशिक, नगर भागांतील धरण समूहातून सोडल्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थांबवल्यानंतर आता हळूहळू जायकवाडीतील पाण्याचे आवकही घटत चालली आहे. शनिवारी (ता. २) सकाळी सहा वाजताच्या सुमारास जायकवाडीत केवळ ५७६० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्या वेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ४५.८९ टक्क्यांवर पोहोचला होता.

नाशिक, नगर भागांतील मुळा धरण समूह, प्रवरा धरण समूह, गंगापूर धरण समूह व गोदावरी दारणा धरण समूहातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालक यांनी ३० ऑक्टोबरला दिले होते. नोव्हेंबरमधील २४-२५ तारखेपासून नाशिक, नगर भागातील विविध प्रकल्पांतून टप्प्याटप्याने जायकवाडीच्या दिशेने आदेशित पाणी सोडण्यात आले होते.

पाणी येण्याच्या मार्गात तसेच जायकवाडी लाभक्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक नाशिक, नगर भागातील पाणी येण्याआधीच सुरू झाली होती. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत २६ हजार ८२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. बुधवारी सकाळी सहा वाजता ती आवक २३ हजार ४४५ क्युसेकवर आली. बुधवारी (ता. २९) सकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पात २३ हजार ४४५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता जायकवाडी प्रकल्पात १४ हजार ५८९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्या वेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४४.५२ टक्क्यांवर पोहोचला होता. एक डिसेंबरला सकाळी सहा वाजता प्रकल्पात पाण्याची १४ हजार ९६३ क्युसेकने आवक सुरू होती.

त्या वेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४५.३१ टक्क्यांवर पोहोचला होता. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता प्रकल्पातील पाणीसाठा ४५.७७ टक्क्यांवर पोहोचला होता, तर आवक घटून ६९६८ क्युसेकवर आली होती शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पुन्हा प्रकल्पातील आवकमध्ये घट होऊन ती ५७६० क्युसेकवर आली.

त्या वेळी प्रकल्पात जवळपास ४५.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. यंदा १ जूनपासून आतापर्यंत जायकवाडीत जवळपास ३०.७० टीएमसी पाण्याचे आवक झाली. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार सोडण्यात आलेल्या पाण्यासोबतच गत काही दिवसांत लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडीत ५.३७ टीएमसीच्या पुढे पाण्याची आवक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT