Chhatrapati Sambhajinagar News : नगर, नाशिक भागांतील विविध धरण समूहांतून सोडले गेलेले पाणी आता हळूहळू जायकवाडी प्रकल्पात दाखल होणे सुरू झाले आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वीस हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सकाळच्या सुमारास कायगाव टोका परिसरात गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळीत हळूहळू वाढ होत होती.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी ३० ऑक्टोबरला जायकवाडीत समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
हे पाणी सोडण्यासाठी नगर, नाशिक भागांतून झालेल्या विरोधानंतर मराठवाड्यातून हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेसह सर्वपक्षीय जल आंदोलन समितीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आवाज उठविण्यात आला.
विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनानंतर प्रत्यक्षात जायकवाडीसाठी हक्काचे पाणी सोडणे सुरू झाले. सोमवारी रात्रीपासून काही प्रमाणात जायकवाडीच्या पात्रात पाणी येणे सुरू झाले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सूत्रानुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास निळवंडे धरणातून १० हजार क्युसेकने, तर दारणामधून ८२३० क्युसेक, मुकणे ५३९, नांदूरमध्यमेश्वरमधून ६३१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. २६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता गंगापूर प्रकल्पातून सुरू केलेला विसर्ग मंगळवारी सकाळी ९ वाजता बंद करण्यात आला.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास साधारणतः २०००० क्युसेकने पाण्याची आवक जायकवाडी सुरू होती. यामध्ये नाशिकनगर भागातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यासह गत दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे येणाऱ्या पाण्याचाही समावेश होता.
मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अमळनेर कायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात पाण्याची गती वाढली होती. होत असलेल्या पाण्याच्या आवकमुळे जायकवाडीच्या प्रकल्प साठ्यात किंचित वाढ झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास जायकवाडीतील पाणीसाठा ३९.५३ टक्के इतका होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.