Jaykwadi Water : जायकवाडी प्रकल्पात सोडलेला विसर्ग थांबविला

Marathwada Water Issue : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार नगर, नाशिक भागातील धरण समूहातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. ३०) थांबविण्यात आला आहे.
Jaykwadi Water
Jaykwadi WaterAgrowon

Chhatarapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार नगर, नाशिक भागातील धरण समूहातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. ३०) थांबविण्यात आला आहे.

जवळपास ५ टीएमसीवर पाण्याची आवक जायकवाडी प्रकल्पात झाली आहे. अजूनही आवक सुरूच आहे. या आवकेत झालेल्या जोरदार पावसानेही भर घालण्याचे काम केले आहे. आलेल्या पाण्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा ४५.३१ टक्क्यांवर गेला आहे.

नाशिक, नगर भागातील मुळा धरण समूह, प्रवरा धरण समूह, गंगापूर धरण समूह व गोदावरी दारणा धरण समूहातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी ३० ऑक्टोबरला दिले होते.

Jaykwadi Water
Jaykwadi Water Issue : ‘मुळा’तून चार हजार क्युसेकने ‘जायकवाडी’साठी सोडले पाणी

त्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील २४-२५ तारखेपासून नाशिक, नगर भागातील विविध प्रकल्पांतून टप्प्याटप्याने जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्याची पावले उचलली गेली.

दरम्यान पाणी येण्याच्या मार्गात तसेच जायकवाडी लाभक्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक नाशिक, नगर भागातील पाणी येण्याआधीच सुरू झाली होती.

मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत २६ हजार ८२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. बुधवारी (ता.२९) सकाळी सहा वाजता ही आवक २३ हजार ४४५ क्युसेकवर आली. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास प्रकल्पात २३ हजार ४४५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

Jaykwadi Water
Jaykwadi Dam : ‘जायकवाडी’त पाण्याची २३४४५ क्युसेकने आवक सुरू

३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत १४ हजार ५८९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४४.५२ टक्क्यांवर पोहोचला होता. शुक्रवारी (ता. १)सकाळी सहा वाजता प्रकल्पात पाण्याची १४ हजार ९६३ क्युसेकने आवक सुरू होती. त्यावेळी प्रकल्पातील पाणीसाठा ४५.३१ टक्क्यांवर पोहोचला.

पाणी पाळी थांबविली

जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी डाव्या कालव्यातून सुरू असणारी पाणी पाळी थांबविण्यात आली आहे. एक ते २९ नोव्हेंबर दरम्यान या पाळीतून जवळपास ७८ दलघमी पाणी रब्बीच्या सिंचनासाठी सोडण्यात आले. शिवाय, उजव्या कालव्यातूनही ११ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जवळपास ३६ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. गत दोन दिवसांपासून ३०० क्युसेकने माजलगाव धरणासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com