Infestation Rice & Sugarcane agrowon
ॲग्रो विशेष

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Infestation Rice Crop : राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरात भात पिकावरील खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान अचानक पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पिकांना याचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. चंदगड, राधानगरी, करवीर, पन्हाळा तालुक्यातील भात पिकांवर खोड किड, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे तर ऊस पिकावर हातकणंगले, शिरोळ या तालुक्यात लोकरी मावा वाढत आहे.

राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरात भात पिकावरील खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव आहे. भात पीक पोटरीला आल्याने याच काळात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम भात शेतीवर झाला आहे. भात शेतीत मोठ्या प्रमाणात खोड किडाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भाताच्या मुळाशी खोड कीड लागल्याने उत्पादन घटणार असल्याची माहिती येथील शेतकरी देत आहेत.

लोकरी माव्याने शेतकरी चिंतेत

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप दोन महिन्यांचा अवधी असताना शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांमध्ये उसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

उसाची उंची वाढल्याने फवारणी करणेदेखील कठीण बनले आहे. अशा स्थितीत लोकरी माव्यावर नियंत्रण ठेवणे हे एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे उरला आहे. तर काही ठिकाणी महापुराने बुडालेल्या उसात जाणे कठीण असल्याने फवारणी करण्यासही अडचणी येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT