Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : भातपिकांवर करप्याचा प्रादुर्भाव

Kharif Season : भातपिकांची पात पिवळी होत असून, वाढही थांबल्याचे चित्र अनेक भागांत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी भातपिकांची वाढ खुंटलेली असताना आता जिल्ह्यातील शेकडो भातपिकाला करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. भातपिकांची पात पिवळी होत असून, वाढही थांबल्याचे चित्र अनेक भागांत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड करण्यात आली आहे. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे या वर्षी भातपीक हंगामदेखील उशिराने सुरू झाला. दरम्यान, जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरविली. पुरेशा पाण्याअभावी भातपिके लागवड केलेल्या स्थितीतच आहेत. अलीकडील काही दिवस पाऊस पडत आहे. परंतु भातपिकांची अपेक्षित वाढ होताना दिसत नाही असे असतानाच आता नवे संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यातील शेकडो एकर भातपिकावर करप्याचा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड या तालुक्यांतील भरडी जमिनीतील भातपिकांवर करप्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. वाढत असलेल्या करप्यामुळे भातपीक उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

करप्याचा प्रादुर्भाव प्रत्येक तालुक्यांत आहे ही वस्तुस्थिती आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ होत आहे. करप्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना फवारणी घेण्यासाठी सूचित करणे देखील कठीण झाले. जमिनीत ओलावा अजिबात राहिलेला नाही. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तत्काळ कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारण्या घ्याव्यात.
एकनाथ गुरव, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी कार्यालय, कणकवली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT