Dog breeds of India Agrowon
ॲग्रो विशेष

Dog Breeds of India : ओळख भारतातील श्वान प्रजातींची...

Team Agrowon

डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. संदीप कोमटवर

Indigenous Dog Breed : पूर्वी श्वानांचा उपयोग शिकार, घर राखण्यासाठी केला जात असे. त्यामुळे तेव्हा उदयास आलेल्या प्रजाती उग्र, संतापी व धष्ट पुष्ट अशा होत्या. उपयुक्तता बदलली तशा श्वानांच्या अनेक प्रजाती उदयास आल्या.

यामध्ये ग्रेटडेन सारख्या विशाल प्रजाती पासून ते पग, चि-हूवा-हूवा, पॉमेरियन या सारखे अगदी लहान आकाराचे श्वान संगोपन सुरू झाले. परदेशात श्वानांना थेरपी अॅनिमल्स’ म्हणजेच उपचारासाठी वापरले जाते.

भारतातील श्वान संगोपनाचे स्वरूप हल्लीच बदलेले असले तरी खेडोपाडी श्वानांचा उपयोग घर व शेती राखण्यासाठीच प्रामुख्याने होतो. शहरी भागात जरी विदेशी प्रजाती जागोजागी दिसत असल्या तरी ग्रामीण भागात गावठी जातींचे संगोपन केले जाते.

सध्या भारतात बोटावर मोजण्या इतक्या परिभाषित जातिवंत प्रजाती आहेत. भारतातील विविध राज्यात संगोपन केल्या जाणाऱ्या श्‍वान जातींचे योग्य वर्गीकरण करून त्यांची ठळक वैशिष्ट्य व्यापक व पद्धतशीररीत्या अभ्यासण्याची आवश्यकता आहे.

गद्दी

१) श्वान भक्कम शरीराचे, मोठ्या आकाराचे असतात.

२) प्रजातीचा उगम उत्तर प्रदेशातील मेरठ प्रांतातील जंगली श्‍वानांपासून झाला असल्याचे समजते.

३) श्वानाच्या शरीरावरील केस छोटे असतात. मागच्या पायावर व शेपटीवर लांबसर झुपकेदार केस असतात. कान छोटे व गोलाकार असतात.

४) रंग काळपट व उदरस्थ भाग फिक्कट रंगाचा असतो. खांद्यापर्यंत उंची ५० ते ७० सेंटीमीटर इतकी असून वजन २५ ते ५० किलो असते. या प्रजातीचा समावेश केसाळ जातीमध्ये करतात.

बंजारा

१) या प्रजातीच्या श्वानांना ताजी किंवा सनेहता असे ओळखले जाते.

२) श्वान निमुळत्या अंगाचे असतात. तोंड निमुळते आणि लांबसर असते. शरीरावरील केस बारीक असतात. कान छोटे गोलाकार व चेहऱ्याच्या दोन्ही बाजूस समांतर स्थितीत असतात.

३) खांद्यापर्यंत उंची ४० ते ६० सेंटीमीटर इतकी असून वजन २० ते ३० किलो असते.

४) प्रजातीचे वर्गीकरण हाऊंड प्रकारात केले जाते.

५) श्वान फिक्कट पिवळसर, बदामी रंगाचे किंवा नारंगी व पिवळसर रंगाचे असतात. क्वचित पट्टा असणारे ही असतात. या प्रजातीचे जातिवंत श्वान भारतात विरळ आहेत.

रामपूर हाऊंड

१) उत्तर भारतातील ही शिकारी प्रजाती आहे. श्वान निमुळत्या बांध्याचे असतात.

२) शरीरावर बारीक केस व कान अर्धगोलाकार असतात.

३) रंग बदामी ते तपकिरी या दरम्यान असतो.

४) छातीचा भाग रुंद तर कंबर निमुळती असते. खांद्यापर्यंत उंची ४० ते ६० सेंटीमीटर आणि वजन २० ते ३० किलो पर्यंत असते.

५) शेपटी सरळ व लांब असते. पुढे टोकाकडे निमुळती होत जाते.

भुतिया

१) या प्रजातीचे भुतिया आणि बुली असे मुख्य दोन प्रकार पडतात. या प्रजातीचे उत्पत्तिस्थान हिमालयाच्या पर्वत रांगा असले तरी हे

श्वान उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये देखील जोमाने वाढताना दिसतात. २) बुली ही प्रजात आकाराने लहान असून, केस मात्र लांबसर असतात.

३) भुतिया ही प्रजाती आकाराने मोठी असते. शरीरावरील केस दाट व बारीक असतात.

४) भुतिया आणि बुली प्रजातीतील श्वान तपकिरी पायांचे आणि काळपट रंगाचे असतात. शेपटी जाड व झुपकेदार असते.

५) बुली प्रजातीची उंची २० सेंमी, वजन १० किलो आणि भुतिया प्रजातीची उंची ४५ सेंटीमीटर वजन १५-३० किलो असते. हे श्वान अत्यंत ताकतवान असतात.

राजपालयम

१) या प्रजातीचे मूळ स्थान केरळ राज्यातील राजपालयम या गावातील आहे. हे शिकारी श्वान आहेत. २) श्वान फिक्कट पांढऱ्या रंगाचे असून उंच लांबलचक व सडपातळ असतात.

३) खांद्यापर्यंत उंची ४० ते ५० सेंमी, वजन २० ते ३० किलो असते.

४) निळे डोळे असलेली कुत्री सहसा उत्परिवर्तनामुळे जन्मजात आंधळी असतात.

हिमालयन श्वान

१) अत्यंत दाट व मऊ केस अंगभर असलेली ही प्रजात हिमालय पर्वत रांगात सापडते.

२) मेंढी पालनासाठी संरक्षक म्हणून या श्वानांचे संगोपन केले जाते.

३) या प्रजातीचे वैशिष्ट म्हणजे छातीवर डौलदार पांढऱ्या केसांचा गुच्छ.

४) शेपूट गोलाकार व कान छोटे असतात. रंग शक्यतो पांढरा असतो.याचबरोबरीने गव्हाळ आणि इतर रंग आढळतात.

कारवान

१) या श्वानांच्या छातीचा भाग रुंद तर कंबर निमुळती असते. श्वान हडकुळे दिसतात. नाक निमुळते वा लांबलचक असते. शरीर ही निमुळते असते.

२) या प्रजातीची उत्पत्ती महाराष्ट्रातील दख्खन पठारापासून झालेली आहे. खांद्यापर्यंत उंची ६८ ते ७२ सेंटीमीटर असते.

३) रंग पिवळसर काळा, काळा व बदामी असतो. मुधोळ हाऊंड आणि कारवान या दोन्ही श्वान प्रकारात विशेष फरक आढळून येत नाही. मुधोळची शेपटी कारवान पेक्षा लांब असते. मान कमी मांसल असते.

४) पश्मी

१) या प्रजातीचे श्वान हाउंड प्रकारातील आहेत.यांचे कान मुधोळ किंवा कारवान पेक्षा मोठे व झुपकेदार असतात. शेपटी, पायावर सुद्धा केसांचे झुपके आढळतात.

२) श्वान बदामी, काळ्या व पांढऱ्या रंगाचे असतात.

कुंबई

१) दक्षिण भारतात सापडणारी ही प्रजात राजपालयम प्रजाती पेक्षा उंचीने कमी पण अधिक भारदस्त दिसते.

२) प्रजातीचा रंग लाल किंवा बदामी रंग असतो. जबडा अत्यंत शक्तीशाली असतो.

३) पाठीवर मानेपासून शेपटीपर्यंत काळपट रेघ दिसते. या प्रजातीच्या श्वानांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे.

चिप्पीपारी

१) ही दक्षिण भारतातील विशेषतः केरळमधील हाऊंड प्रकारातील प्रजात आहे.

२) यांचा बांधा निमुळता असतो. शरीर लांबलचक असते. शिंपल्यासारखा चकाकणारा रंग असणाऱ्या श्वानांना अधिक मागणी आहे.

३) केस खूप बारीक व तजेलदार असतात. प्रजातीचा उपयोग शिकार आणि घर रक्षणासाठी करण्यात येतो.

कान्नी

१) तमिळनाडू राज्यातील मदुराईमधील ही प्रजाती आहे. हे श्वान काळ्या रंगाचे असतात.

२) दुधाळ, काळपट, चॉकलेटी रंग असतो. या प्रजातीचे श्वान कमी झाले आहेत.

चिप्पीपारी

१) ही दक्षिण भारतातील विशेषतः केरळमधील हाऊंड प्रकारातील प्रजात आहे.

२) यांचा बांधा निमुळता असतो. शरीर लांबलचक असते. शिंपल्यासारखा चकाकणारा रंग असणाऱ्या श्वानांना अधिक मागणी आहे.

३) केस खूप बारीक व तजेलदार असतात. प्रजातीचा उपयोग शिकार आणि घर रक्षणासाठी करण्यात येतो.

संपर्क - डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. संदीप कोमटवर - (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tripartite Committee : आचारसंहितेपूर्वी त्रिपक्ष समिती स्थापन करा

Buldana Urban Warehouse : ‘बुलडाणा अर्बन’ने तयार केली नऊ लाख टन क्षमतेची साठवणूक क्षमता

Monsoon Retreat : मॉन्सून दमदार बरसला हंगामात राज्यात २६ टक्के अधिक पाऊस

Post-Monsoon Season : मॉन्सूनोत्तर हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

Banana Farming : केळी लागवड वाढण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT