Export Non Basmati Rice agrowon
ॲग्रो विशेष

Export Non Basmati Rice : केंद्राचा सात देशांना दिलासा; गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास दिली मान्यता

Non Basmati Rice : नेपाळ, कॅमेरून, कोटे डी'आयव्होर, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्समध्ये गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

sandeep Shirguppe

Non Basmati Rice : भारत सरकारने मागच्या काही महिन्यांपूर्वी गैर -बासमती तांदळावर बंदी घातली होती. दरम्यान यावर केंद्राकडून ७ देशांना दिलासा देत ही बंदी उठवण्यात आली आहे. केंद्राने २० जुलै रोजी गैर -बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. काल झालेल्या बैठकीत नेपाळ, कॅमेरून, मलेशियासह अन्य देशांमध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीस केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.

व्यापार मंत्रालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे. यानुसार १० लाख ३४ हजार टन तांदळाची निर्यात करता येणार आहे. फिलिपाईन्स, सेशेल्स, कोटे डी आयवर, गिनी आदी बेटसमूह देशांतील अन्नसुरक्षेसाठी या देशांना तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या तांदळाला जगभर मागणी आहे. मान्सूसचा अपुरा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने उत्पादनात घट अपेक्षित धरून केंद्राने जुलै महिन्यात तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशात तांदळाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

यानंतर नेपाळ, कॅमेरून आणि मलेशियासह सात देशांना १० लाख ३४ हजार ८०० टन गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास सरकारने मान्यता दिली. विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लि. (NCEL) द्वारे हे करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी भारताने २० जुलैपासून गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी, सरकार काही देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

सरकारने नेपाळ, कॅमेरून, कोटे डी'आयव्होर, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्समध्ये गैर-बासमती तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

अधिसूचनेनुसार, नेपाळला ९५ हजार टन, कॅमेरूनला १ लाख ९० हजार टन, कोटे डी'आयव्होरला १ लाख ४२ हजार टन, गिनीला १ लाख ४२ हजार टन, मलेशियाला १ लाख ७० हजार टन, फिलीपाईन्स ९५ हजार टन, मलेशियाला ९५ हजार टन पुरवण्यात येणार आहे. तर सेशेल्सला ८०० टन. गैर-बासमती तांदूळ निर्यात केला जाणार असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT