Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Loan : अंथरूण पाहून हातपाय पसरा...

Loan EMI : ‘कर्ज काढू नका’ अशा सल्ल्यातून गरिबांना काहीही मार्गदर्शन होत नाही. गरीब कर्जे काढणारच आहेत. बँका / मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नाही दिली, तर अधिक खतरनाक खासगी सावकारांकडून काढतील.

संजीव चांदोरकर

Microfinance : ‘कर्ज काढू नका’ अशा सल्ल्यातून गरिबांना काहीही मार्गदर्शन होत नाही. गरीब कर्जे काढणारच आहेत. बँका / मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नाही दिली, तर अधिक खतरनाक खासगी सावकारांकडून काढतील.

त्याऐवजी ‘कर्जाचा हप्ता (ईएमआय) आपल्याला झेपेल एवढाच ठेवला पाहिजे’ यातून त्यांना ठोस अर्थबोध होऊ शकतो. तुम्ही महिन्याला ३००० रुपये हप्ता भरू शकत असाल तर खरे तर एवढेच कर्ज काढा, की त्याचा हप्ता २००० किंवा २५०० रुपयांपर्यंतच बसेल. उरलेल्या १०००-५०० रुपयांचे कुशन ठेवले पाहिजे.

कर्जाचे हप्ते डोईजड झाले तर पहिला घाला आहार, आरोग्यावरच्या खर्चावर घातला जातो. कारण तेच खर्च गरिबांच्या डिस्क्रिशनमध्ये असतात. आपल्याला आहार, आरोग्यावरचे खर्च कमी करावे न लागता आपण किती हप्त्याचे ओझे सहन करू शकतो याचा ढोबळ आकडा आधी काढायचा. त्यावरून ‘बॅक कॅल्क्युलेट’ करून कर्ज किती काढायचे हे ठरवायचे.

‘स्वतःचे अंथरूण पाहून हातपाय पसरा’ या गरीब स्त्रियांनी स्वतःच शेकडो वर्षे विकसित केलेल्या शहाणपणाची आठवण गरिबांनी जागविण्याची गरज आहे. कर्ज काढणे तत्त्वतः वाईट नाही, ते प्रमाणाबाहेर काढणे वाईट आहे, हे नवीन वित्त तत्त्वज्ञान रुजवावे लागेल. न झोपणारे कर्ज काढले तर कर्जबाजारीपणा येतो.

दिवसाचे २४ तास चिंतेचा भुंगा मन पोखरत राहतो. जिणे हराम होते. सकस आहार महाग म्हणून कमी किंवा बंद होतो. आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्यावरचे खर्च वाढतात. कुटुंबात ताणतणाव वाढतात. आत्महत्येचे विचार घोंघावू लागतात... अशी ती शृंखला आहे.

त्याचा पुढचा गंभीर टप्पा असू शकतो- कर्ज सापळ्यात अडकण्याचा (डेट ट्रॅप). आधीच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी नवीन, एखाद्या दुसऱ्या धनकोकडून कर्ज काढायला लागणे आणि हे सतत करावे लागणे याला कर्ज सापळ्यात अडकणे म्हणतात. कदाचित आयुष्यभर या सापळ्यात अडकावे लागते.

कर्जप्रेरणा

गरिबांना कोणत्याही नैतिक भूमिकेतून उपदेश करण्याची गरज नाही. आयुष्य छान जगावेसे वाटणे ही उपजत मानवी भावना आहे. या संदर्भात खालील छोटे उदाहरण बरेच काही सांगून जाते. काही वर्षांपूर्वी मुंबईतील गरीब वस्तीत कर्जबाजारीपणा बद्दल एक सर्व्हे घेतला गेला होता. एका छोट्या घरात पाच वर्षांच्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात येत होता. मुलीच्या आईने सांगितले, की त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तिने कर्ज काढले आहे.

‘या कार्यक्रमावर झालेला खर्च मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगी पडला असता’ या सूचना वजा प्रश्‍नावर त्या मुलीची तरुण आई म्हणाली, ‘लहानपणचे वाढदिवस मोठे झाल्यावर देखील मुलांच्या लक्षात राहतात. आमच्या मुलीचे आणि आमचे / आईवडिलांचे भावनिक बंध तयार होणे देखील आम्हाला तेवढेच महत्त्वाचे वाटते. उद्या आमच्याकडे चार पैसे जास्तीचे असतील देखील. पण तिचे वय काय परत येणार आहे?’

गरीब कुटुंबे आयुष्याकडे, कर्जाकडे कसे बघतात याची जाण मायक्रो फायनान्सची वैचारिक मांडणी करताना खूप महत्त्वाची आहे. गरिबांच्या आर्थिक प्रश्‍नांची, कर्जबाजारीपणाची चर्चा करू पाहणारी कोणतीच वैचारिक मांडणी शुष्क असता कामा नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Protection : शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे शक्य आहे का?

Pune APMC : ...तर पुणे बाजार समितीला लागलेले ग्रहण सुटेल

Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

SCROLL FOR NEXT