Onion Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला कांदा निर्यात होणार; प्रत्येकी १० हजार टन निर्यातीस परवानगी

Onion Market : विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना काढून श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारने श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) प्रत्येकी १० हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने यूएईला यापूर्वीच २४,४०० टन कांदा निर्यातीची परवानगी दिलेली होती. त्यात आता अतिरिक्त १० हजार टन कांद्याची भर पडणार आहे.  याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाने सोमवारी (ता.१५) अधिसूचना काढली आहे. मात्र सतत पडणारे कांद्याचे दर आणि कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा रोष केंद्र सरकारवर वाढत आहे. 

केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु ३१ मार्चनंतर निर्यातबंदीची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली.  परंतु या बंदी दरम्यान विविध देशांना सरकारी स्तरावर कांदा निर्यातीसाठी परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार आता श्रीलंका आणि यूएईला प्रत्येकी १० हजार टन कांदा निर्यात केला जाणार आहे. ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) मार्फत केली जाणार आहे. 

केंद्र सरकारने निवडणुकांवर डोळा ठेऊन महागाईदर वाढू नये, यासाठी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्याला कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. ३१ मार्चनंतर निर्यात खुली होईल, अशी आशा वाटत होती. परंतु ती फोल ठरवत सरकारने निर्यातबंदीला मुदतवाढ दिली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

पाच देशांना कांदा निर्यात

बंदी असतानाही वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारत सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशला ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती.

यात भूतानला ५५० टन, बहरीनला ३ हजार टन, मॉरिशसला १२०० टन, बांगलादेशसाठी ५०,००० टन, संयुक्त अरब अमिरातीला २४,४०० टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

Protest On NAFED: कांदा प्रश्नावर नाशिकमध्ये काँग्रेसचा नाफेडवर मोर्चा; पारदर्शक खरेदीची मागणी

Crop Loss: केळी, कांदा नुकसानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा

Dry Rivers: खानदेशात अनेक नद्या कोरड्या

Urad Crop Loss: कमी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला फटका

SCROLL FOR NEXT