Jalgaon News: चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे व परिसरात २६ ते २८ फेब्रुवारी यादरम्यान गारपीट व वादळी पाऊस झाला. यात कोट्यवधींची पीकहानी परिसरात झाली. सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला गेला. नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. .पीक जोमात असताना ते जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून अहवालही तयार करण्यात आले. आता नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी कायम आहे..Urad Crop Loss: कमी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला फटका.मेहुणबारेसह परिसरातील धामणगाव, जामदा, भऊर, खडकीसीम, दसेगाव, लोंढे, दरेगाव, पिंजारपाडे, विसापूर, चिंचगव्हाण, कृष्णापुरी तांडा, वरखेडे तांडा, वरखेडे गाव, पळासरे, पिंपळवाडी, दहिवद भागात वादळी पावसात मोठी हानी झाली होती. जवळपास २० ते २५ मिनिटांच्या या वादळामुळे या परिसरातील शेतांमधील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली होती..Cotton Crop Loss: लाखेगाव येथे कपाशी पिकाला ‘आकस्मिक’ संकटाचा फटका.काही भागांत मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. ज्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, केळी, पपई, शेवगा, टरबूज, लिंबू आदींचे नुकसान झाले होते. शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. वादळात शेतातील मल्चिंग पेपर फाटून काही शेतांमध्ये शेडनेटचेही नुकसान झाले होते. .वरखेडे भागातील केळीला वादळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. या भागातील सर्वच्या सर्व केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. केळीचे पीक काढणीवर आलेले असतानाच होत्याचे नव्हते झाले..वलठाण, पाटणा, चंडिकावाडी, बेलदारवाडी, गणपूर, कोदगाव, गणेशपूर, चितेगाव, पिंप्री बुद्रूक व प्र. चा., वाघडू, तांबोळे बुद्रूक व खुर्द, निमखेडी, बाणगाव, रांजणगाव, पिंपरखेड, शिवापूर, लोंजे, आंबेहोळ, खेरडे, सोनगाव, बोढरे, सांगवी, तळोंदे, जामदा, सायगाव, अलवाडी, नांद्रा, पिंपळवाड म्हाळसा गावातही पीकहानी झाली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.