Corona Virus  Agrowon
ॲग्रो विशेष

COVID India : देशात कोरोना रुग्णसंख्या ६००० वर

Active Corona Patient : देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा वेग वाढू लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांचा टप्पा पार करत असताना, मागील २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

New Delhi News : देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा वेग वाढू लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांचा टप्पा पार करत असताना, मागील २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ सध्या सर्वाधिक प्रभावित राज्य असून येथे सर्वाधिक १९५० सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ५९५ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत देशभरात ७६९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या एकूण ६१३३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. २२ रोजी देशात केवळ २५७ सक्रिय रुग्ण होते; त्यामुळे मागील काही आठवड्यांमध्ये संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे.

या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील आरोग्य सुविधांची तयारी तपासण्यासाठी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्सिजन, आयसोलेशन खाटा, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये मागील २४ तासांत १४४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १९५० झाली आहे. त्याखालोखाल गुजरातमध्ये ८२२, दिल्लीमध्ये ६८६, महाराष्ट्रात ५९५, कर्नाटकमध्ये ३६६, उत्तर प्रदेशात २१९, तमिळनाडूमध्ये १९४, राजस्थानमध्ये १३२ आणि हरियानामध्ये १०२ सक्रिय रुग्ण आहेत.

मागील २४ तासांत केरळमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमध्ये दोन जणांचा आणि तमिळनाडूत एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आकडेवारीमुळे जानेवारीपासून देशात आतापर्यंत कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या ६५ झाली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन २ आणि ३ जून रोजी आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत केंद्र सरकारच्या विविध आरोग्य संस्थांच्या आणि सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका होऊन त्यात विद्यमान स्थिती व संभाव्य उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या अंतर्गत इन्फ्लुएंझा सदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन विकार असलेल्या रुग्णांवर राज्य व जिल्हास्तरीय यंत्रणांमार्फत काटेकोर पद्धतीने नजर ठेवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT