COVID-19 Cases: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय; नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी: आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर

Health Minister Prakash Abitkar: महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ४९४ रुग्ण बाधित आहेत. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला तातडीने आणि जबाबदारीने काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Health Minister Prakash Abitkar
Health Minister Prakash AbitkarAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशात पुन्हा एकदा कोविड-१९ चा प्रसार वाढत आहे. सद्यस्थितीत देशात  ४३०० कोरोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३०० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ४९४ रुग्ण बाधित आहेत. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला तातडीने आणि जबाबदारीने काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Health Minister Prakash Abitkar
COVID-19 India: भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३,७५८ वर पोहोचली; महाराष्ट्रात कोविडचे ५०६ बाधित रुग्ण

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार जरी वाढला तरीही यातील कोरोना बाधितांपैकी जास्तीत जास्त रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे सध्या घाबरायची गरज नाही, पण काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना यापुढेही आपल्या सोबतच राहणार आहे. पूर्वीपेक्षा आताच्या परिस्थितीला आपल्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढली आहे.

Health Minister Prakash Abitkar
Mumbai COVID Update : कोरोनाविरोधात ठाण्यात आरोग्य यंत्रणा सज्ज

त्यामुळे सध्या कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. फक्त ज्या कोविड बाधितांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांना धोका आहे. अशा नागरिकांनी  विशेष काळजी घ्यावी. मृत्यू होण्याचे कारण कोरोनामुळे नाही, तर या आजारांमुळेच होत आहे  असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे रुग्णसंख्या जास्त वाढत आहे. तसेच आपण केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहोत. त्यामुळे लोकांनी घाबरू न जाता आपापली योग्य काळजी घ्यावी. तसेच प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क असून नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com