Tur Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Price : मोझांबिकच्या बंदरात अडकली तूर डाळीची खेप ; दरवाढीमुळे सरकारची चिंता वाढली

Tur Export : देशांतर्गत तूर डाळीचे भाव गगनाला भिडले असून ही टंचाई दूर करण्यासाठी केंद्राने आयात धोरण राबवले आहे. दरम्यान, तूर आयातीची पहिली खेप मोझांबिक बंदरांवर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Swapnil Shinde

Tur Market Rate : सणासुदीच्या तोंडावर देशात तूरडाळीच्या भावाने उसळी घेतली आहे. बाजारात तुटवडा असल्याने डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी मोदी सरकारने मोझांबिकमधून (Mozambique) तूर डाळ खरेदी केली आहे, परंतु तूरीची खेप मोझांबिक बंदरांवरच निर्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

यंदा माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. तूरडाळीने तर रोज दराचा उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा १७० रुपयांवर पोहोचले आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, तूरडाळ (Toor Dal) महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ आता १५० ते १७५ रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सरकारने डाळींच्या किमती नियंत्रित करण्यासाठी परदेशातून १० दशलक्ष टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला. परंतू मोझांबिक सरकारकडून तूर डाळी निर्यातीची मंजूरी मिळत नसल्याने तूरीचा माल मोझांबिकच्या बंदरावर अडकला आहे. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. तूरीची लवकरात लवकर आयात करण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी मोझांबिक सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर डाळ निर्यातीस परवानगी देण्याची विनंती केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Latur Rain : कर्नाटक सीमावर्ती भागांत पावसाने नुकसान

Rain Update : सिंधुदुर्गात संततधारेने दाणादाण

Warna Dam : सांगलीत वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

khandesh Water Projet : चाळीसगावातील मन्याड प्रकल्प अल्पावधीत ७५ टक्के भरला

SCROLL FOR NEXT