Non Basmati Rice agrowon
ॲग्रो विशेष

Rice Export : केंद्राकडून तांदळाच्या निर्यातीवरील निर्बंध वाढवण्याची शक्यता

Parboiled Rice Curbs: देशांतर्गत तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकार उकडा तांदळावरील निर्बंध वाढवण्याची शक्यता आहे. पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने जगभरातील तांदळाच्या किमतींवर होऊ शकतो.

Swapnil Shinde

Rice Inflation : एल निनोमुळे जगभरातील तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणले आहे. . त्यामुळे आशियासह संपूर्ण जगात तांदळाच्या किमतींवर परिणाम होऊ लागले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी मोदी सरकार उकडा तांदळावरील २० टक्के निर्यात शुल्काची मुदत वाढविण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, आगामी सणासुदीचा हंगाम आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार हा निर्णय घेऊ शकते.

विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमतीत झालेली वाढ पाहता केंद्र सरकारने उकडा तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू आहे. भारताने जुलैमध्ये निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आशियाई बाजारातील तांदळाच्या किमती १५ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या होत्या. भारताने निर्यात शुल्क लादण्याबरोबरच, खराब हवामानाचाही यंदा तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, खराब हवामान आणि एल निनोच्या प्रभावामुळे भारतासह जगभरात तांदूळ उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तांदळाचा प्रमुख निर्यातदार असलेल्या इंडोनेशियाचे यंदा तांदळाचे उत्पादन सरासरीपेक्षा कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच व्हिएतनामनेही अशीच परिस्थिती आहे.

सणासुदीचा हंगाम आणि निवडणुका लक्षात घेता देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने निर्यात शुल्काची मुदत वाढवली तर त्याचा परिणाम जगभरातील तांदळाच्या किमतींवर नक्कीच होईल. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये उकडलेले तांदूळ सर्वाधिक वापरले जातात. भारतात दरवर्षी तांदळाच्या अनेक जाती पिकवल्या जातात, ज्यात उकडा तांदूळ हा एक प्रमुख भाग आहे. देशातील तांदूळ निर्यातीत उकडा तांदळाचा वाटा 30 टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT