India Rice Export News: भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यापासून जगभरात तांदळाच्या किंमतींनी १२ वर्षातील उच्चांक गाठला आहे. मागच्या महिन्यातील म्हणजे जुलै महिन्यात संयुक्त राष्ट्र फूड एजन्सीने तांदळाचा निर्देशांक मांडला यामध्ये तांदळाचे रेट १२ वर्षांत पहिल्यांदा उच्चांकी दरावर गेला असल्याची माहिती दिली.
भारतासारख्या तांदूळ निर्यात करणार्या देशात तांदळाच्या किमती वाढल्यामुळे तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्यात आली. निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे असे एजन्सीचे म्हणणे आहे. एजन्सीने सांगितले की, जुलैमध्ये अन्न आणि कृषी संघटनेचा (एफएओ) ऑल राइस प्राइस इंडेक्स १२९.७ पॉईंट राहिला. तर गेल्या महिन्यात हा इंडेक्स १२६.२ वर होता.
सध्या भारताकडून जवळपास ४० टक्के तांदळाची निर्यात होते. अशातच तांदळाच्या देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले. याचबरोबर हवामानातील बदलामुळे तांदळाच्या उत्पादनावर संकटाची शक्यता आहे. त्यामुळे किमती अनेक वर्षांच्या उच्चांकी स्थितीत पोहोचल्या आहेत.
भारत, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, पाकिस्तान हे प्रमुख तांदूळ निर्यातदार देश आहेत. तर चीन, फिलिपाइन्स, सेनेगल, नायजेरिया, मलेशिया हे मुख्य आयातदार देश म्हटले जातात.
तांदूळ निर्यातीच्या निर्बंधांमुळे उर्वरित जगामध्ये अन्नधान्याच्या किमतींमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय तांदळाचे कमी झालेले उत्पादन हे देखील तांदळाच्या किमती वाढण्यासाठी मोठे कारण आहे.
अहवालानुसार, भारत, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया आणि पाकिस्तान हे तांदूळ निर्यात करणार्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर, चीन, फिलीपिन्स, बेनिन, सेनेगल, नायजेरिया आणि मलेशिया हे मुख्य आयातदार आहेत.
भारतातून गैर-बासमती पांढर्या तांदळाची एकूण निर्यात २०२२-२३ मध्ये USD ४.२ दशलक्ष होती जी मागील वर्षात USD २.६२ दशलक्ष होती. भारताच्या बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीच्या प्रमुख गंतव्यस्थानांमध्ये अमेरिका, थायलंड, इटली, स्पेन आणि श्रीलंका यांचा समावेश होतो.
तांदळाच्या वाढत्या किमतीचा अनेक देशांतील अन्नसुरक्षेवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी तांदूळ हे मुख्य अन्न आहे आणि जास्त किंमतीमुळे लोकांना हे आवश्यक अन्न परवडणे अधिक कठीण होऊ शकते. अमेरिकेत देखील याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. अमेरिकेत तांदूळ खरेदीसाठी दुकानाबाहेर लोकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. याचे व्हिडिओ गेल्या महिन्यात व्हायरल झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.