Rice Price : पुणेः देशातील वाढते तांदळाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच सरकार बासमती तांदूळ निर्यातीवर बंधन घालण्यासाठी किमान निर्यात मूल्य लागू करू शकते, असेही सूत्रानी सांगितले. देशातील तांदळाचे भाव मागील काही महिन्यांपासून वाढत आहेत. तांदळाच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने २० जुलै रोजी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणली होती.
या बंदीनंतरही देशातील तांदळाचे भाव वाढत आहेत. देशात यंदा पाऊसमान चांगले नाही. खरिपातील तांदूळ लागवड वाढली तरी पावसामुळे उत्पादकता घटणार आहे. यामुळे तांदळाचे भाव पुढील काळातही वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळेच सरकारने अर्ध उकलेल्यातांदूळ निर्यातीवर शुल्क लावल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकतेच याबबातची अधिसूचना काढली. सरकारने अर्ध उकलेल्या तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावले. या शुल्काची अंमलबजावणी लगेच होणार आहे. पण सरकारने अधिसूचना काढण्याआधी निर्यातीचे करार झालेल्या तांदळाची निर्यात १५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये सरकारला खरिपातील तांदूळ निर्यातीचा अंदाज येऊ शकतो. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये खरिपातील तांदूळ उत्पादनाचे चित्र स्पष्ट होऊ शकते. खरिपातील तांदळाची आवक सुरु झाल्यानंतर भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच एफसीआय १ ऑक्टोबरपासून सुरु होऊ शकते.
तर निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत आहे. पण तोपर्यंत उत्पादनाची पूर्ण कल्पना येऊ शकते. त्यामुळे सरकारची ही चाल चांगली आहे. उत्पादन कमी झाल्यास अर्ध उकडलेल्या तांदळाची निर्यातही सरकार बंद करू शकते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
…………………
आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतील
भारत सरकारने निर्यातीवर २० टक्के शुल्क लावल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव वाढू शकतात. याचे परिणाम विशेषतः आग्नेय आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू शकतात. सध्या भारताचा अर्ध उकडलेला तांदूळ ५०० डाॅलर टनाने मिळतो आहे. आता २० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे हा भाव ६०० डाॅलरवर पोचेल. आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज जाणकारांनी सांगितले.
…………….
बासमतीवर किमान निर्यात मूल्य?
सरकार अन्नधान्याचे भाव वाढल्याने आक्रमक झाले आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीच्या बैठकीत बासमती तांदूळ निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लागू करण्याचा निर्णय झाला आहे. विदेश व्यापार महासंचालनालय हा निर्णय लागू करण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.