Vegetable
Vegetable Agowon
ॲग्रो विशेष

Vegetable Seed Market : जागतिक भाजीपाला बियाणे बाजारात भारताचा दबदबा

Team Agrowon

New Delhi News : आठ अब्ज डॉलर्स (६६७०९.२० कोटी भारतीय रुपये)च्या जागतिक भाजीपाला बियाणे बाजारात भारतीय बियाणे कंपन्यांचा प्रमुख उत्पादक देशांच्या तुलनेत दबदबा वाढला आहे. भारताचा हा आलेख वाढता असून चीन, जपान, अमेरिकेप्रमाणे भारतही भाजीपाला बियाणे निर्यातीत आघाडी मिळवत असल्याचे एस ॲन्ड पी ग्लोबल कमोडिटी इनसाईटस् (जीसीआय) या जागतिक पातळीवर बाजार अभ्यास करणाऱ्या कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

जागतिक बियाणे बाजारात मका, सोयाबीननंतर भाजीपाला बियाण्यांचे वर्चस्व आहे. यातही ८० टक्के भाजीपाला बियाणे हे प्रामुख्याने चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, इटाली, स्पेन, अमेरिका, मेक्सिको आणि ब्राझील या १० देशांतून निर्यात होतात. जागतिक भाजीपाला बियाणे बाजार अत्यंत स्पर्धात्मक आहे. यात जगभरातील केवळ १२ कंपन्यांची वार्षिक विक्री १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

बऱ्याच कंपन्या ३० पेक्षा जास्त पिकांच्या प्रजातींचे बियाणे पुरवतात, तर आठ कंपन्यांचे भाजीपाल्याच्या बियाण्यांमध्ये वर्चस्व आहे. जागतिक पातळीवर प्रामुख्याने ४० हून अधिक भाजीपाला पिके विविध श्रेणी, प्रजाती आणि वर्गात व्यापलेल्या आहेत आणि त्यांच्या बियाण्यांचा बाजार मोठा आहे. मात्र, यातील विविधता संधी बरोबर कंपन्यांकरिता उत्पादन आणि पुरवठ्यासंदर्भातील आव्हानेही घेऊन येतात.

कंपन्या भाजीपाला बियाणे उत्पादनाकरिता आपल्या संशोधन आणि विकासात (आरॲन्डडी)लक्षणीयरित्या गुंतवणूक करतात. यात बहुतेक कंपन्यांच्या विक्रीच्या १५ टक्के ते ३० टक्के इतका खर्च समावेशित असतो. ‘आर ॲन्ड डी’ मधील ही गुंतवणूक नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीसाठी केली जाते. ज्यामुळे पीक उत्पादन वाढीसह चव, पौष्टिक मूल्य, सादरीकरण आणि टिकवण क्षमता यांसारखी वैशिष्ट्ये वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

अलीकडील उदाहरणांमध्ये उच्च लाइकोपीनसह आरोग्य-केंद्रित टोमॅटो वाणाची निर्मिती, स्नॅक्स योग्य भाजीपाला ब्रँड आणि सुपरमार्केट शेल्फसाठी तयार केलेले दीर्घकाळ टिकणारे टोमॅटो यांचा समावेश होतो. संकरीकरण हे भाजीपाला बियाणे बाजारातील वाढीचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. ८० टक्के-९० टक्के भाजीपाला प्रजाती आता संकरित बियाण्यांपासून तयार होत आहेत.

भारतीय कंपन्यांची महत्त्वाची भूमिका

चीन, भारत, स्पेन, मेक्सिको आणि जपान यासारखे देश संरक्षित शेतीचा अवलंब करण्यात आघाडीवर आहेत, खुल्या शेतातील उत्पादन पद्धतींच्या तुलनेत संरक्षित शेतीत जास्त उत्पादन मिळते. जागतिक भाजीपाला बियाणांच्या बाजारपेठेला विकसित करण्यात भारतीय उद्योगांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगती आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये बदलाचा अभ्यास करून भारत आणि इतर आघाडीची राष्ट्रे भाजीपाला बियाणे उत्पादनात नावीन्य आणण्यात आणि जगभरातील उच्च-गुणवत्तेच्या भाजीपाल्याच्या वाणांची वाढती मागणी पूर्ण करण्यात सक्षम आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

जगभरातील लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी भाजीपाला बियाण्यांची बाजारपेठ देखील जागतिक स्तरावर वाढत आहे. ग्राहक देखील आरोग्यदायी व पोषणमूल्यांनी भरपूर अशा अन्नाची मागणी करू लागला आहे. भारतीय आयुर्वेदिक शास्त्रानेही भाज्यांचे महत्त्व आणि वैद्यकीय गुणधर्म अधोरेखित केले आहेत. अलीकडील काही वर्षांत वेलवर्गीय तसेच भेंडीसारख्या भाजीपाल्याचा खप आणि त्यांची लोकप्रियता आशियासह आफ्रिकी देशांमध्ये वाढली आहे. सर्वात प्रकर्षाने सांगावयाची गोष्ट म्हणजे उत्पादकता, गुणवत्ता व रोगप्रतिकारकता या बाबींच्या अनुषंगाने भारतात भाजीपाला पिकांमध्ये संशोधन होत आहे. या सर्व बाबी पाहता भारतीय भाजीपाला बियाणे उद्योगाचा वेगाने विस्तार होईल यात शंका नाही.
- प्रशांत बेलगमवार, विभागीय प्रमुख (आशिया व आफ्रिका) ॲडव्हान्टा सीडस (यूपीएल उद्योग समूह)
भारतात अन्य देशांच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्या सर्वांना एकत्र आणून भाजीपाला पिकांचे ‘क्लस्टर्स’ तयार केले तर देशात खूप मोठी क्रांती होऊ शकते. भारतात काही राज्य शेडनेट तसेत पॉलिहाऊस, सिंचन आदींच्या माध्यमातून अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार देत आहेत. भारतात भाजीपाला पिकांची संख्याही मोठी आहे. साहजिकच भारतीय बियाणे कंपन्यांना या पिकांमध्ये मोठी संधी आहे तीन ते चार पिकांवर जरी त्यांनी लक्ष केंद्रित केले तरी भारतातील बियाणे कंपन्यांची फार मोठी प्रगती होऊ शकते. त्यासाठी संशोधनावर अधिक भर देणे गरजेचे आहे.
- समीर मुळ्ये, व्यवस्थापकीय संचालक, अजित सीडस, औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Crop Competition : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT