Team Agrowon
काळी ते मध्यम अशी सुपीक व पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असल्यास त्यात घेतलेली भाजीपाला उत्पादनाची टिकवणक्षमता ही हलक्या मुरमाड जमिनीपेक्षा जास्त असते.
कमी तापमानामुळे भाजीपाला पिकांच्या शरीरशास्रीय हालचाली संथ होऊन परिपक्वतेला उशीर होतो. त्यामुळे टिकवण क्षमता कमी होते. अधिक तापमानामुळे परिपक्वता लवकर येऊन टिकवण क्षमता कमी होते.
आपण कशासाठी उत्पादन घेणार आहोत, त्यानुसार वाणांची निवड केली पाहिजे. उदा. चिप्स करण्यासाठी बटाटा लागवड करणार असू, तर त्यासाठी खास जाती उपलब्ध आहेत.
पिकाला संतुलित व शिफारशीनुसार खते देणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादन वाढीसोबत काढणीनंतरच्या टिकवणक्षमतेसाठी महत्त्वाचा असतो.
पीक अवस्थेनुसार योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा. गरजेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी दिल्यास पिकाच्या वाढीवर / परिपक्वतेवर परिणाम होतो.
आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे केलेला सायटोकायनिनयुक्त संजीवकांचा वापर फळभाज्यांची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास भाजीपाल्यामध्ये रासायनिक घटकांचे अंश राहण्याची समस्या कमी होते. तसेच त्यांचे काढणीपश्चात आयुष्य वाढू शकते.