Soymeal Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market Rate : जागतिक पातळीवर सोयापेंडची निर्मिती वाढल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव : थाॅमस मिल्के

Thomas Mielke : मागील ५ वर्षांपासून पामतेलाचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढत असून सोयातेलासाठी गाळपही वाढत आहे. त्यामुळे सोयापेंडची अतिरिक्त निर्मिती होत आहे.

Anil Jadhao 

Pune News : मागील ५ वर्षांपासून पामतेलाचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढत असून सोयातेलासाठी गाळपही वाढत आहे. त्यामुळे सोयापेंडची अतिरिक्त निर्मिती होत आहे. परिणाम भाव कमी झाले. पण त्याचा परिणाम भारताच्या नाॅन जीएम सोयापेंडेच्या भावावरही होत आहे, असे ऑईल वर्ल्डचे कार्यकारी संचालक थाॅमस मिल्के यांनी सांगितले. 

मुंबई येथे सुरु असलेल्या ग्लोब ऑईल काॅन्फरन्समध्ये जागतिक खाद्यतेल मागणी-पुरवठा आणि किंमत अंदाज या विषयावर थाॅमस मिल्के यांनी मार्गदर्शन केले. मिल्के म्हणाले की, पामतेल आता स्वस्त राहीले नाही. पामतेलाच्या किमती सोयातेलापेक्षा जास्त आहेत. पामतेलाचे उत्पादन कमी होत असल्याने २०२५-२६ च्या वर्षातही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. कारण पामतेलाचे उत्पादन वाढवायचे म्हटल्यास किमान ४ ते ५ वर्षे लागतील. कारण पामची आता लागवड केली तर २०२८ नंतर उत्पादन मिळेल. यामुळे सध्या पामतेल महाग होत आहे. 

मिल्के म्हणाले की, सध्या पाम काढणीचा हंगाम सुरु आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये काढणी सुरु होते. त्यामुळे या तीन महिन्यात पामतेलाचा पुरवठा बऱ्यापैकी वाढलेला असेल. परिणामी काही काळ सोयातेल आणि सूर्यफुल तेलापेक्षा पामतेल स्वस्त राहीले तरी कायमस्वरुपी ही स्थिती राहू शकणार नाही. कारण सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचा पुरवठा वाढलेला आहे. 

यंदाही सोयापेंड पुरवठा जास्त राहणार

सोयाबीनचे उत्पादन वाढले. मागणी असल्याने गाळपही वाढले. २०२४ मध्ये जागतिक सोयाबीन गाळप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सोयातेल आणि सोयापेंडची निर्मिती वाढली आहे. २०२४-२५ च्या हंगामातही सोयातेलासाठी सोयाबीनचे गाळप १६० ते १७० लाख टनांनी वाढण्याचा अंदाज आहे. मात्र या गाळपामुळे सोयापेंडचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. सोयाबीनचा भाव सोयातेलापेक्षा सोयापेंडच्या भावावर जास्त प्रमाणात अवलंबून असतो. पण अतिरिक्त पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव कायम राहू शकतो.  

भारत उत्पादकतेत मागे

जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादन आणि गाळप वाढत आहे. त्यामुळे सोयातेल आणि सोयापेंड निर्मितीही वाढली. पुरवठा वाढून भावावर दबाव येत आहे. पण भारतात उत्पादकता कमी असल्याने स्पर्धेत टिकत नाही. जागतिक पातळीवर हेक्टरी ३ टन उत्पादकता असताना भारतात केवळ १ टन उत्पादकता आहे. उत्पादकता कमी असल्याने भारताला सोयाबीन आर्थिकदृष्ट्या परतावा देऊ शकत नाही. त्यासाठी भारताने हेक्टरी उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असेही मिल्के यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT