Pankaja Munde & Sharad Pawar Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Pankaja Munde & Sharad Pawar Meeting : 'त्या' भेटीचा उद्देश साध्य झाला; ऊसतोड कामगारांच्या मागणीवर निघाला तोडगा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील ऊसतोड कामगारांनी मजूरीत वाढ मागत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची पुण्यात गुरूवारी (ता. ४ रोजी) सायंकाळी पुण्यात भेट घेतली होती. ज्यात ऊसतोड कामगारांच्या मागणीला यश आले असून मजुरीत ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ऊसतोड कामगार मजूरीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पुण्यातील साखर संकुलमध्ये पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी यावर तोडगा काढण्यात आला. यावेळी राज्य साखर महासंघाचे पी आर पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या मागणीवर सुरू असणाऱ्या प्रश्नावर शरद पवार आणि पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ऊसतोड कामगार मजुरीत ९२ रुपयांची वाढ घोषित करण्यात आली. याच्याआधी ऊसतोड कामगारांना २७४ रुपये प्रति टन मजुरी दिली जात होती. पण आता यात ९२ रुपयांची वाढ करण्यात आल्याने याच हंगामात कामगारांना ३६६ रूपये प्रति टन मजुरी मिळणार आहे.

राज्यातील ऊस कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस कधी जाणार ही चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्याला लागली होती. दरम्यान ऊसतोड मजुरीवरून नवा पेच निर्माण झाला होता. तसेच यावर तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगारांनी कोयता बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

तसेच याप्रश्नावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करावी असाही निर्णय झाला होता. त्याप्रमाणे ही बैठक झाली होती. ज्यातून यावर तोडगा निघाला असून ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करण्यात आली आहे.

मुकादम कमिशनही वाढले

ऊसतोड कामगारांच्या मागणीवर तोडगा निघला असून कामगारांच्या मजुरीत ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याचबैठकीत मुकादमांच्या कमिशनवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच मुकादम यांच्या कमिशनमध्ये देखील १ टक्क्याची वाढ करण्यात आली आहे. तर त्यांना मजुरीच्या 20 टक्के कमिशन दिले जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT