Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : दूधदर वाढवून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू

Nana Patole : राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यांत शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे सोमवारी (ता. २४) प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, की श्वेतक्रांतीमध्ये ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यांनाच राज्यातील भाजप-शिंदे सरकार लुटत आहे.

गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत. हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून भाजप- शिंदे सरकारनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Rate : ११ महिन्यांनंतरही 'कापूस उत्पादकता अभियाना'ला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा; केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा कागदावरच

India-New Zealand FTA: न्यूझीलंडमधून आयात वाढणार?, काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकरी चिंतेत, केंद्रावर आश्वासन मोडल्याचा आरोप

Flood Damage Compensation: घोषणा ४७ हजारांची; मदत केवळ पाच हजार

Rabi Crop Competition: रब्बीसाठी ‘कृषी’ची पीक स्पर्धा

Onion Cultivation: देवणीत कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

SCROLL FOR NEXT