Milk Adulteration : भेसळयुक्त दुधामुळेच दूध उत्पादक अडचणीत

Milk Adulteration Scam : राज्यात दूध भेसळ हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दुधाला दर मिळत नसताना दुधातील भेसळ थांबवण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. राज्यात दूध भेसळ हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे २५ जून रोजी शेतकरी संघटनेकडून दूध दरासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेकडून गावोगावी बैठका, मेळावे घेऊन आंदोलनाच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

उंदीरगाव (ता. श्रीरामपूर) येथे दूध उत्पादकांचा मेळावा झाला. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, जिल्हाध्यक्ष व दूध उत्पादक अनिल औताडे, अप्पासाहेब पाटील ताके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना अॅड. काळे म्हणाले, ‘‘राज्यासह देशात इतर कुठल्याही मालावर एमआरपी छापून तिची विक्री होत आहे. परंतु शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कुठल्याही मालाला एमआरपी नाही हे दुर्दैवी आहे.

Milk Rate
Milk Rate : दूध उत्पादकांची रोज २५ कोटी रुपयांची लूट

काँग्रेसने त्यांचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कायदेशीर किमतीचा कायदा तयार केला नाही. त्याच पद्धतीने गेल्या दहा वर्षांपासून भाजप सरकारनेही त्यात बदल केले नाही. दुधासह सर्वच शेतीमालाला आधारभूत किमतीला किंवा स्वामिनाथन आयोगाला कायदेशीर आधार मिळावा म्हणून आपण शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या ताकदीवर रस्त्यावरील लढाई लढणार आहोत.

वर्षभरापूर्वी दुधाला ३४ ते ३८ रुपये प्रति लिटर दर होता. शिंदे सरकारच्या काळात हा दर २२ रुपये झाला. पाच रुपये अनुदानाच्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली. भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळेल ही अपेक्षा होती, परंतु शेतकऱ्यांना सदर अनुदान अद्यापही मिळालेले नाही. या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कायदेशीर पत्र देणार आहे.

Milk Rate
Milk Rate : दुधाच्या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवणार : माने

२५ जून रोजी दूध दरासाठीचे आंदोलन तीव्र असेल असे या वेळी सांगण्यात आले. सागर गिऱ्हे, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, डॉ. विकास नवले, माळेवाडी सोसायटीचे चेअरमन दिलीपराव औताडे, अरुण पाटील मुठे, संदीप नवले, बाळासाहेब असणे, सुनील असणे, बाळासाहेब घोडे, बबनराव नाईक, प्रकाश ताके, सुनील भारदंड, प्रमोद भालदंड, राजेंद्र गुंड, सतीश नाईक आदींसह शेतकरी उपस्थित होते.

‘खर्च पाहून तरी दर द्या’

अॅड. काळे म्हणाले, ‘‘दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च पाहून तरी सरकारने दर द्यावा. सोलापूर जिल्हा दुग्ध पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गायीच्या एक लिटर दुधास ६५ रुपये तर म्हशीच्या एक लिटर दुधास ९२ रुपये खर्च येतो.

शासनाने ही आकडेवारी काढलेली असेल तर स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार गाईच्या दुधास ९० रुपये व म्हशीच्या दुधास १३५ रुपये एका लिटरला कायदेशीर दर मिळावा. शासन, दुग्धविकासमंत्री यांनी हा दर देण्याऐवजी दुधाचे दर ३८ रुपयांवर २२ रुपयांवर आणले आहेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com