Pune News: इस्रायलने आज (ता.२८) इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा तीव्र झाला आहे. राजधानीत मोठा स्फोट झाल्यानंतर इराणने देशभरात आणीबाणी जाहीर करत हवाई क्षेत्र बंद केले. हा हल्ला संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे इस्रायलने सांगितले असून यासाठी अमेरिकेची मदत घेतल्याच स्पष्ट केले आहे . या घटनेमुळे इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकण्याची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे..इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाजवळ हल्ला…हा हल्ला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ झाला. हल्ल्याच्या वेळी खामेनी त्या ठिकाणी उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेनंतर राजधानी तेहरानमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे..Iran-Israel Conflict : इराण आणि इस्त्रालयच्या संघर्षामुळे; देशात इंधन महागणार का?.प्रतिबंधात्मक कारवाई म्हणत हल्ल्याच समर्थन…इस्रायल आणि अमेरिकेने हा हल्ला ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ असल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी निवेदनात सांगितले की, इराणकडून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याला रोखण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेशी समन्वय साधून ही कारवाई केल्याचेही संकेत दिले आहेत..Israel-Iran War: ईस्त्राईल इराण युध्दाचा भारतालाही फटका; शेतीमालाची निर्यात प्रभावित होण्याचा धोका.पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता…या घटनेमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. जून २०२५ मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात १२ दिवसांचा संघर्ष झाला होता. त्यानंतर काही काळ परिस्थिती शांत होती, मात्र आता पुन्हा दोन्ही देश आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे. इराणच्या अणु कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेबाबत अमेरिका आणि इतर देशांकडून दबाव वाढत असतानाच हा हल्ला झाला आहे..फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इराण यांच्यात या विषयावर चर्चा सुरू होती. मात्र या हल्ल्यानंतर त्या चर्चांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनेमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरता वाढू शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.