Urad Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Urad Sowing : उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवा

Kharif Sowing : शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे असे आवाहन खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने यांनी केले.

Team Agrowon

Jalna News : शेतकऱ्यांनी उडीद पिकाखालील क्षेत्र वाढवावे असे आवाहन खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने यांनी केले. वखारी (ता. जालना) गुरुवारी (ता. १२) येथे आयोजित उडीद शेती दिन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी निवृत्ती घुले यांच्या उडीद पीक प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन पाहणी केली.

डॉ. सोनुने म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत या वर्षीच्या खरीप हंगामात एकूण ५० हेक्टर क्षेत्रावर १२५ शेतकऱ्यांच्या शेतावर पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड या वाणाची प्रथमदर्शी पीक प्रात्याक्षिके घेण्यात आली आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला तरी अजूनही आपणास डाळी व खाद्यतेल बाहेरील देशातून आयात करावी लागतात.

त्यात उडीद व तूर या पिकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे या पिकांची उत्पादकता वाढविण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. उडीद हे कडधान्य पीक असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत करते, तसेच प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

उडीद पिकाची उत्पादनक्षमता चांगली असून, सध्या बाजारभावही चांगले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व शिफारशींचा अवलंब करून उडीद पिकाखालील क्षेत्र उत्पादन वाढवावे, असेही ते म्हणाले.

या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल चौधरी, कुसळी येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल वैद्य, निवृत्ती घुले, रामप्रसाद खैरे यांचेसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना पुनरुत्पादन शेती, शून्य मशागत तंत्रज्ञान, कापूस उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वखारी येथील रामप्रसाद खैरे यांनी केले तर आभार निवृत्ती घुले यांनी मानले. कार्यक्रमास सुमारे ५० गावांतून शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

Pomegranate Care: अतिवृष्टीनंतर डाळिंबाच्या बागेचे व्यवस्थापन कसे कराल?

Miraj Market: मिरज दुय्यम बाजारातील गाळ्यांवरून वाद

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा अंदाज

Farm Relief: अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करा

SCROLL FOR NEXT