QR Code Agrowon
ॲग्रो विशेष

FPC Mahaparishad 2023 : ‘क्यूआर कोड’द्वारे वाढवा शेतीमालाची विश्वासार्हता

Farmer Producer Company : ‘‘शेतकरी कंपन्यांना संधी निर्माण झाल्यानंतर व्यवसायावर होणारा खर्च, नफा याची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘क्यूआर कोड’द्वारे माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे.

Team Agrowon

टीम अॅग्रोवन

Agrowon FPC Mahaparishad : पुणे : ‘‘शेतकरी कंपन्यांना संधी निर्माण झाल्यानंतर व्यवसायावर होणारा खर्च, नफा याची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘क्यूआर कोड’द्वारे माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे.

त्यामुळे ग्राहकांमध्ये एक प्रकारची विश्वासार्हता निर्माण होईल,’’ असे आवाहन इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी केले.

‘अॅग्रोवन’च्या एफपीसी महापरिषदेतील ‘बदलते व्यापार ट्रेण्ड आणि एफपीसीना संधी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. श्री. नरके म्हणाले, की कंपन्यांनी काम करताना कोणत्या क्षेत्रात काम करायचे, हे ठरवावे. ठरविलेल्या व्यवसायात खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ ठेवावा लागेल. व्यापकता आल्यानंतर मालाची किंमत तेवढीच राहते.

कोणत्याही व्यवसायाची निवड करावी. भविष्यातील संधी कोणत्या आहेत, याचा विचार केल्यास नक्कीच फायदा होईल. त्यानुसार पिकांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. पीक घेताना ताळेबंद ठेवणे अत्यंत आवश्यक असून, त्यावर पकड असणे गरजेचे आहे. ताळेबंद माहीत असल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात पडू नये, गट शेती करताना पशुगट संवर्धन करण्याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

सह्याद्री फार्म्सचे संचालक अजहर तंबूवाला म्हणाले, की निर्यातीच्या मोठ्या संधी आपल्याकडे आहेत. पण त्याचा फारसा विचार केला जात नाही. कंपन्यांनी त्या दृष्टीने विचार केल्यास नक्कीच फायदा होईल. ‘सह्याद्री’ने निर्यातीच्या उद्देशाने अनेक मॉडेल तयार केली आहेत.

मालाची निर्यात करताना ट्रेसिबिलिटी अत्यंत गरजेची असून, त्यामुळे मालाची सर्व माहिती मिळण्यास मदत होईल. त्यापूर्वी सर्टिफिकेशन आवश्यक आहे. त्यासाठी विविध संस्था काम करतात, ते करून घेतल्यास जगात अनेक संधी उपलब्ध होतील. त्यासाठी आपण तयार आहोत की नाही याचा अभ्यास केला पाहिजे, असे ते म्हणाले.

कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाचे पीक विश्लेषक सचिन कदम म्हणाले, ‘‘कंपन्यांना अलीकडील काळातील ट्रेंडची कल्पना नसते. कंपन्यांनी काम करताना ग्राहकाची पसंती लक्षात घेऊन बदल केले पाहिजेत. मूल्यवर्धित वस्तूचा उपभोगाचे प्रमाण वाढत आहे, त्यानुसार बदल केल्यास नक्कीच फायदा होईल.

ग्राहकांची पसंती, चव, गुणवत्ता याचा विचार केल्यास सर्व माहिती आपल्याजवळ असावी. परंतु आपल्याला मालाची किंमत माहिती नसणे, काढणीनंतर गोदामाची सुविधा, तारण कर्ज न मिळणे, अशा बाबीची माहिती नसेल तर अनेक अडचणी उभ्या राहतात. आपल्याला सर्व बाबींची माहिती असेल, तर मालाची किंमत स्थिर ठेऊ शकतो. त्यासाठी मार्केट इंटेलिजन्सविषयी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT