Dr. Pramod Sawant Agrowon
ॲग्रो विशेष

Spice Crop Cultivation : मसाला पीक लागवडीतून उत्पन्न वाढवा : डॉ. सावंत

Team Agrowon

Dapoli News : कोकणात मसाला पिकाला पोषक हवामान आहे. तसेच कोकणात समुद्रसपाटीला नारळ, सुपारी या पिकांच्या मोठ्या बागा आहेत. त्यामुळे सध्याच्या बदलत्या हवामानात मुख्य पिकांवर परिणाम दिसून आल्यामुळे अशा हवामानात हमखास उत्पादन देणाऱ्या मसाला पिकांची लागवड केल्यास शेतीचे उत्पन्न वाढू शकते, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

उद्यान विद्या महाविद्यालय, दापोलीच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विस्तार शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया’ या विषयावर दोन दिवसीय जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. सावंत होते. उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, डॉ. प्रकाश शिनगारे, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. चंद्रकांत पवार, डॉ. जगदीश कदम आदी उपस्थित होते. डॉ. पराग हळदणकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी जिल्हास्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचा उद्देश सांगितला. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शंका विचारून पूर्णपणे समाधान करून घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोकणातील विविध मसाला पिकांचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. तसेच हळदीच्या एकूण ३६ विविध जाती प्रदर्शित केल्या होत्या. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे व सोवेली ग्रामपंचायतीचे सरपंच जयेश मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या जिल्हास्तरीय सत्रामध्ये दालचिनी, काळी मिरी, कोकम, हळद, आले, जायफळ, इत्यादी मसाला पिकांच्या लागवडीची माहिती डॉ. पराग हळदणकर, डॉ. चंद्रकांत पवार, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. प्रफुल्ल माळी, डॉ. मकरंद जोशी, डॉ. सुमेध थोरात, डॉ. राकेश गजभिये यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

SCROLL FOR NEXT