Agriculture Exhibition : आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी कृषी प्रदर्शनाचे व्यासपीठ उपयुक्त

Chandrakant Patil : शेतकऱ्यांना एक चांगले व्यासपीठ प्रदर्शनामुळे उपलब्ध झालेले असून, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिद्धेश्‍वर यात्रेतील कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटन प्रसंगी केले.
Chandrakant Patil
Chandrakant PatilAgrowon
Published on
Updated on

Solapur News : कृषी प्रदर्शनातून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊन, त्याचा शेतीमध्ये पुरेपूर वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना एक चांगले व्यासपीठ प्रदर्शनामुळे उपलब्ध झालेले असून, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिद्धेश्‍वर यात्रेतील कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटन प्रसंगी गुरुवारी (ता. २८) केले.

सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त हे प्रदर्शन भरले आहे. या उद्‍घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, यात्रा कमिटीचे अध्यक्ष महादेव चाकोते, कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्‍वर वाघमोडे, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, विजयकुमार बरबडे, बाळासाहेब भोंगडे, बसवराज शास्त्री उपस्थित होते.

Chandrakant Patil
Agriculture Technology : भातकापणी तंत्र, त्यातील यांत्रिकीकरण

पालकमंत्री पाटील यांनी अशा प्रदर्शनाची शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर गरज आहे, सिद्धेश्‍वर देवस्थानचा यासाठीचा पुढाकार निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले. या वेळी पालकमंत्री पाटील यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. स्टॉलवरील विविध तंत्रज्ञान व अद्यावत तंत्रज्ञाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

Chandrakant Patil
Agriculture Exhibition : ‘अॅग्रोटेक’मध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी हे प्रदर्शन दरवर्षी शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरते आहे, कमी वेळ आणि कमी श्रमातातील तंत्रज्ञान येथे पाहायला मिळणार आहे, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. श्री. बरबडे यांनीही हे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या सोईचे आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान देणार आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले.

शेतीविषयक विविध दालने, सोमवारपर्यंत कृषी प्रदर्शन

सिद्धेश्‍वर देवस्थान, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी नऊपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार आहे.

या प्रदर्शनात विविध कृषी निविष्ठा, अवजारांसह कृषीशी संबंधित ३५० स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. त्याशिवाय शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट यांचेही स्टॉल्स आहेत. विविध तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासह खरेदीची संधीही या ठिकाणी उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com